चर्चा:सिव्हीलायझेशन ५

लेखाचे नाव संपादन

'सिव्हिलाइजेशन'च्या बदली मी 'सिव्हिलिजेशन' वापरण्यापूर्वी मी इंग्रजी विक्शनरीचा सल्ला घेतलेला. कारण हा अमेरिकन खेळ आहे व ह्याचे इंग्रजी स्पेलिंगसुद्धा अमेरिकन इंग्रजीत लिहिलेले जाते ('Civilisation' न्हवे, 'Civilization'), त्याचे मुळ उच्चारसुद्धा आपण अमेरिकन धरावे.

देवनागरी लिपीत आई.पी.ए उच्चार 'z' साठी 'ज' अक्षर वापरला जातो. 'झ' चा उच्चार आई.पी.ए मध्ये 'zʱ' असा केला जातो. यामुळे आपण 'झ' च्या जागी 'ज' वापरावा असे मला योग्य वाटते.

शेवटी मला असे वाटते की आई.पी.ए च्या अनुसार आपण 'सिव्हलिजेशन' असे लिप्यंतरण वापरायला हवे. Sabretooth १३:२५, ११ जानेवारी २०१२ (UTC)

थोडक्यात संपादन

सिड मायर्स सिव्हलिजेशन ५ ला थोडक्यात सिव्हलिजेशन ५ म्हणतातच, व सिव्ह ५ असे सुद्धा प्रसिद्ध आहे. ते दोन्ही आपण लेखात ठेवावे. Sabretooth १३:३१, ११ जानेवारी २०१२ (UTC)

संस्कृती व सभ्यता संपादन

खेळात दोन महत्त्वाच्या संज्ञा म्हणजे Culture आणी Civilization. मी यांसाठी मराठी अनुवाद म्हणून 'सभ्यता' व 'संस्कृती' असे निवडले. जर आपण Civilization ला संस्कृती म्हणून म्हटले, तर Culture साठी एक विशेष शब्द सुचवायला लागेल, नाहीतर वाचक गोंधळतील. Sabretooth १३:४४, ११ जानेवारी २०१२ (UTC)

Culture आणि Civilization संपादन

एकाच खेळात जर हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आले असतील तर त्यांचे भाषान्तर अनुक्रमे सभ्यता अणि संस्कृती असे केले असेल तर ते पटण्यासारखे आहे. मराठीत सभ्यता हा शब्द नसणे ही एकच अडचण आहे. दुर्दैवाने मराठीत दोन्ही इंग्रजी शब्दांना संस्कृती असाच प्रतिशब्द आहे. एका इंग्रजी शब्दाला वेगवेगळ्या अर्थाचे दोन किंवा अधिक मराठी शब्द असणे किंवा एकाहून अधिक इंग्रजी शब्दांना एकच मराठी प्रतिशब्द असणे हे फारचे विचित्र नाही. असे सगळ्याच भाषांच्या बाबतीत होते.

ize हा प्रत्यय प्रामुख्याने जे शब्द ग्रीक किंवा लॅटिनमधून इंग्रजीत आले आहेत त्यांना लागतो. ise किंवा iceहा फ्रेंचमध्ये रूढ आहे. इंग्लंडवरील फ्रेंचांच्या आक्रमणाच्या काळात अनेक ize असलेल्या शब्दांत त्याऐवजी ise आले. जरी काही अमेरिकन कोशांत अजूनही Civilisationही सापडत असले आणि काही ब्रिटिश छापखानदार अजूनही iseच वापरत असले तरी तरी आता बहुतेक शब्द मूळपदावर आले असून ize ही अमेरिकन स्पेलिंगची मक्तेदारी राहिलेली नाही.(अजूनही advertise, apprise, arise, chastise, demise, despise, devise, exercise, surprise वगैरे अनेक शब्दांत iseच लागतो आणि जस्टिस्, सर्विस् सारख्या शब्दांत ice.)

Civilization. या शब्दाचा वेगवेगळ्या अमेरिकन कोशांत वेगवेगळा उच्चार सापडेल. सिव़लझ़ेशन, सिव़िलिझ़ेशन, सिव़िलाइझ़ेशन वगैरे. मराठीत मात्र सिव्हिलायझ़ेशन् हा एकुलता एक उच्चार आणि शब्दाचे सिव्हिलायझेशन हे एकुलते एक लिखाण. विकिपीडियावर फक्त प्रमाण मराठी लिखाण करणे अपेक्षित असल्याने तो खेळ अमेरिकन आहे की आणखी कोणता याला काही महत्त्व नाही. महाराष्ट्रातील स्थानिक मराठी त्या नावाचा कसा उच्चार करतात आणि कसे लिखाण करतात हेच विचारात घेतले पाहिजे. (बंगालीत हा शब्द सिभिलाइजेशन असा लिहिला गेला असता; त्यांच्या शब्दकोशातही असाच छापलेला असतो!) सदरहू लेखातही मूळ लेखकाने अमेरिकन नावाचे मराठी भाषान्तर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक भाषक आय्, बाय्, माय्, व्हाय, हे शब्द अनुक्रमे आई, बाई. माई, वाई असे उच्चारतात आणि लिहितात, मराठीत तसे नाही....J ०७:४९, १२ जानेवारी २०१२ (UTC)

सिवलेजेशन ५ संपादन

मराठी 'जॉर्ज दि फिफ्थ' अशी शब्दरचना होत नाही. त्याऐवजी 'पाचवा जॉर्ज' असे म्हणावे लागते. त्याच प्रघातान्वये 'सिवलिजेशन ५' असे म्हणायच्या ऐवजी 'पाचवी सिव्हिलायझेशन' किंवा सिव्हिलायझेशन-पाचवी आवृत्ती असे काहीसे म्हणणे अधिक मराठी आहे.

इंग्रजीमधल्या संयुक्त वाक्यात दिसणारी, मुख्य वाक्यांश आधी आणि दुय्यम वाक्यांश नंतर अशी रचना मराठीत नसते. त्यामुळे वाक्यामध्ये, 'जे, ज्यामुळे, ज्या प्रकारे, जसे' असल्यांपैकी एखाद्या शब्दाने सुरू होणारा (दुय्यम)वाक्यांश अगोदर आणि 'ते, त्यामुळे, त्या प्रकारे, तसे' ह्यांनी सुरू होणारा मुख्य क्लॉज मागाहून अशी रचना योग्य समजली जाते. लेखात अशा बर्‍याच अनुचित वाक्यरचना झाल्या आहेत. त्यांतल्या काही मी दुरुस्त केल्या आहेत.....J ०९:०७, १२ जानेवारी २०१२ (UTC)

"सिव्हीलायझेशन ५" पानाकडे परत चला.