या लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल.

हा लेख सुधारण्यासाठी संपादन

@MA$HRVA:

  • ह्या लेखाला आवश्यकतेपेक्षा जास्त संख्येने संदर्भ जोडलेले आहेत असे प्रथमदर्शनी वाटले परंतू, ह्या जास्तीच्या संदर्भांचा उपयोग मजकूर वाढवण्यासाठी करुन ते संदर्भ वाढवलेल्या मजकूराला जोडावेत असे मला वाटते.
  • शिवाय काही संदर्भ ट्वीटर, ब्लोग किंवा खाजगी संकेतस्थळांचे आहेत, ते वैध संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकत नाहीत, तेव्हा ते काढावेत अशी‌ मी आपल्याला विनंती करत आहे.
  • बाकी जिथे शक्य आहे तिथे पुस्तके, संशोधन निबंध यांचे संदर्भ देऊन बातम्यांवर असलेला भर कमी केल्यास जास्त विश्वासाऱ्हता आणता येईल. बाकी मी‌ काही जास्त अनुभवी नाही चार ओळी जास्त लिहिल्या एवढच, बाकी ध्येय धोरणांमध्ये जे आहे ते एकदा पाहुन घ्या जेणेकरून आपल्याला मदत मिळेल. काही तांत्रिक अडचण आल्यास बिनधास्त साद द्या मी आपल्याला मदत करिनच. धन्यवाद सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:२६, १७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: मार्गदर्शनासाठी धन्यवाद. लेखाचा मुख्य साचा तयार झाला की मजकूर वाढविण्यासाठी जरुर प्रयत्न हाेइल. बाकी बाबींचाही प्रयत्न राहील. सदस्य चर्चा:MA$HRVA

@Sureshkhole: या लेखात केवळ दोन वाक्ये लिहिली असताना आपण योग्य तो साचा लावला. मात्र त्यानंतर वेळच्या वेळी अापल्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य व शक्य ते सर्व बदल केलेले आहेत. शिकणे सुरुच राहणार असल्याने पुढेही आपल्या मार्गदर्शनात योग्य ते बदल करता येतीलच. एक विनंती म्हणून असे वाटते की त्यावेळेस लावलेला पानकाढा साचा सद्य परिस्थितीत लेखनाला योग्य तो न्याय देत नाही. तरी लावलेला साचा काढण्याबाबत मार्गदर्शन करावे किंवा सध्याच्या साच्याएेवजी योग्य तो दूसरा एखादा साचा लेखात केलेला बदल लक्षात घेऊन लावता येईल का ते कृपया बघावे. धन्यवाद. सदस्य चर्चा:MA$HRVA|--योग्य तेच !! १३:३४, ८ ऑक्टोबर २०१८ (IST) Reply

"श्रीपाद वैद्य" पानाकडे परत चला.