चर्चा:शंकर आबाजी भिसे

काय अप्रतिम लेख आहे हा! अतिशय उत्तम. ज्ञानात खूप भर पडली आणि अभिमानही वाटला. हा अतिउत्तम लेख लिहिल्याबद्दल सर्व संपादन कर्त्यांचे धन्यवाद. भारतीय शास्त्रज्ञ असा एक वेगळा वर्ग तयार करता येऊ शकतो आणि त्यात खूप लेख लिहिले जाऊ शकतात आणि असलेले लेख वाढवता येऊ शकतात. अजून एक वर्ग तयार करता येऊ शकतो. आणि तो म्हणजे - भारतीय क्रांतीकारक / भारतीय स्वतान्त्यासंग्रमातील योगादान्कर्ते. धन्यवाद. -- आभिजीत १३:१४, १८ जून २०१३ (IST)Reply

अभिजीत म्हणतात ते खर आहे. एका कर्तबगार भारतीय शास्त्रज्ञाबद्दल माहिती वाचून अभिमानही वाटला.अभिजीत यांनी दिलेल्या लिंक्सचा संदर्भ देण्यात कदाचित उपयोग होऊ शकेल.
काही इसवीसन नोंदी तपासण्याची गरज आहे असे वाटते :
  • डॉ. शंकर आबाजी भिसे (जन्म मुंबई, २९ एप्रिल १९६७;मृत्यू : ७ एप्रिल १९३५)
  • .....त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर २००१ रोजी घेतले.

छायाचित्र उपलब्ध झाल्यास जोडावे. लेखकांचे मन:पुर्वक धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३२, १८ जून २०१३ (IST)Reply

--- इसवी सनाच्या चुका दुरुस्त केल्या....J (चर्चा) २३:४१, १८ जून २०१३ (IST)Reply

धन्यवाद .
  • मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले
हे वाक्यातील "यंत्राची आवड ......त्यामुळे उत्तेजनार्थ.....कारकून" - मजकुर तार्कीक सुसंगती असलेला वाटत नाही . संदर्भ देऊन ठेवता येईल म्हणून संदर्भ हवा साचा लावला. अधिक काही तर्क संगत विश्वकोशीय उल्लेखनीयता देणारी माहिती उपलब्ध नसल्यास ....पाहून वडिलांना फार आनंद होत असे. हे वाक्य अविश्वकोशीय वर्णनात्मकता/कथाकथन या प्रकारात मोडत नाहीना म्हणून शंका वाटते. चिकटवले हा शब्द प्रयोग सुद्धा विश्वकोशीय लेखन शैलीस सुसंगत ठरेल का ? विश्वकोशाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे का ? हे पुन्हा एकदा तपासावे आणि शक्य झाल्यास पर्यायी क्रियापदाचा उपयोग करावा असे वाटते.
  • विभागांची काहिशी पुर्नरचना करण्याचा प्रयत्न केला. पण हि विभाग पुर्नरचनाही पुरेशी नाही , बहुधा अधीक लेखन करताना पुन्हा एकदा विभाग पुर्नरचनेची गरज भासेल असा अंदाज आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३८, १९ जून २०१३ (IST)Reply

काही महत्त्वाच्या लिंक

संपादन
"शंकर आबाजी भिसे" पानाकडे परत चला.