मुळ लेखक माहित नाहि

संपादन

मला हा लेख इंटरनेटवर मिळाला, तिथेहि मुळ लेखकांचे नाव नव्हते. मात्र डॉ. सदानंद मोरे याच्या "लोकमान्य ते महात्मा - खंड १" या पुस्तकात हिच माहिती मिळते.

लेखाचा मुळ संदर्भ नाहिये, मात्र मोरेंनी हिच माहिती दिली आहे, काय करता येईल?

सौरभ,
१. विकिपीडियावर मूळ लेखकाच्या संमतीशिवाय मजकूर जसाच्यातसा चढवू नये. संपादनपेटीच्या खाली ही सूचना ठळक अक्षरात आहे -- प्रताधिकारयुक्त लेखन सुयोग्य परवानगीशिवाय मुळीच चढवू/भरू नये! मजकूराचा आढावा स्वतःच्या शब्दात चालतो.
२. मूळ लेखक माहिती नसल्यास या लेखनाला कितपत किंमत द्यावी? Lack of credibility या कारणाने हा लेख काढून टाकण्याची शिफारस झाल्यास त्याविरुद्ध मुद्दा नाही.
३. मोर्‍यांच्या पुस्तकातील माहिती सत्यकथने रुपात लिहून त्याचा संदर्भ द्यावा.
४. हा लेख वैयक्तिक मत असल्यासारखा व ललितलेखनस्वरुपात (एखादी गोष्ट सांगितल्यासारखा) आहे. जरुर ते बदल करावे.
अभय नातू १६:३१, २९ मे २००९ (UTC)

"Lack of credibility या कारणाने हा लेख काढून टाकण्याची शिफारस झाल्यास त्याविरुद्ध मुद्दा नाही."

पण् श्री मोरेंच्या पुस्तकात् जवळपास् ९९% हिच् माहिती - अशीच मिळते, यात् फारसे बदल् न करता "लोकमान्य् ते महात्मा - खंड १" हा ग्रंथ् संदर्भ म्हणुन् दिल्यास् काहिच् फरक् पडणार् नाहिये, उलट् मुळ् लेख हा याच् पुस्तकाचा आधार् घेऊन् लिहिला असावा असे मानायला बरीच जागा आहे.

श्री मोरेंचा ग्रंथ्, या लेखा बरोबरच ब्राह्मणेतर् चळवळीसाठी वापरता येईल्. तरी जमल्यास् तो ग्रंथ् पुनः मिळवुन् हा लेख् नीट् करायचा प्रयत्न करतो. पण् तोवर् हा लेख् निदान् धुळपाटि वरती राहु द्यावा.

सौरभ वैशंपायन १६:५०, २९ मे २००९ (UTC)सौरभ

वेदोक्त म्हणजे नक्की काय? ह्याची basic definition अनुक्रमणिकेच्या वर १-२ वाक्यात लिहिणे आवश्यक वाटते.
तोवर् हा लेख् निदान् धुळपाटि वरती राहु द्यावा.
 
अभय नातू १६:५७, २९ मे २००९ (UTC)

सध्या लेखात या प्रकरणाची केवळ एक बाजू स्पष्ट आली आहे. विरोधी दृष्टिकोनाची मांडणी नसल्यामुळे लेख एकांगी ठरत आहे. त्यामुळे {{वाद}} हे सुचनापट्टी लावली आहे. Mahitgar ०६:२३, ३० मे २००९ (UTC)

सदस्य vinod rakte यांची टिप्पणी

संपादन

वेदोक्त म्हणजे काय?याची माहीती हवी.याचा अतिशय पुढिल भाग म्हणजे वेदोक्त वाद.. अनुनासिक ऊच्चारातील फरक होय.काहीवेळा मुद्दामहुन संस्कृत श्लोकाचे पठन हे कुळ व जाती भेदामूळे अयोग्य ऊच्चारात वा नियमानुसार केले जात नाही. येथे ही वेदोक्ताच्या अधिकाराची भानगड स‌मजून घेतली पाहिजे.

वरील टिप्पणी लेखातून येथे हलवली.

अभय नातू २२:२०, १७ डिसेंबर २००९ (UTC)

बरोबर. वेदोक्त हा लेख 'वेदोक्त' ही संकल्पना मांडण्यापुरताच सीमित असावा. 'वेदोक्त प्रकरण' किंवा 'वेदोक्त वाद' या नावाने स्वतंत्र लेख लिहून त्यात शाहू महाराजांच्या काळातील एतद्विषयक वादाबद्दल लिहावे.
तूर्तास हा लेख पुन्हा लिहून काढण्याजोगा बनला आहे.. साचा:पुनर्लेखन टाकला आहे, हे त्या अर्थी बरे आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५८, १७ डिसेंबर २००९ (UTC)
या लेखासा माहितीबरहुकूम संबधीत ओळीत संदर्भांचीही आवश्यकता आहे.माहितगार ०५:२१, १८ डिसेंबर २००९ (UTC)

१९०१ की १९२१?

संपादन

लेखात लिहिल्याप्रमाणे वेदोक्त प्रकरण १९०१मध्ये झाले. मग त्यासंबंधी ’विद्याविलास’ला पत्र लिहिण्यास शाहू महाराजांनी १९२१ सालापर्यंत वाट का पाहिली?...J (चर्चा) ११:०६, ३१ जुलै २०१३ (IST)Reply

"वेदोक्त" पानाकडे परत चला.