चर्चा:विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

मुख्यमंत्री कार्यकाल ४ वर्षाचा असतो का ५ ? उदय कुलकर्णी (चर्चा) १५:३०, १६ जून २०१४ (IST)Reply

प्रश्नाचा मुख्य उद्देश/पार्श्वभूमी लक्षात नाही आली. कार्यकालाची मर्यादा विधानसभा/लोकसभेला (आणिबाणी सोडून सहसा अधिकतम पाचवर्षाची असते) म्हणून त्याच्या आमदार आणि खासदारांना आमदार आणि खासदार नात्याने कार्यकालाची मर्यादा पुढच्या निवडणूकीत निवडून येई पर्यंत असते. याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या कार्यकालाशी तसा सरळ संबंध नाही. विधानपरिषद आणि राज्यसभेचे सदस्यही मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान असू शकतात विधानपरिषद आणि राज्यसभेचे मधील सदस्यत्वाचा सर्वसाधारण कालावधी सहा वर्षांचा असतो. म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूकीत पुन्हा पुन्हा बहुमत आल्यास बहुसंख्य आमदार/खासदारांचा पाठींबा असल्यास मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सलगतेने रहाता येते अर्थात विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूकी नंतर पुन्हा बहुमत मिळाले तरी टोकन राजीनामा पुन्हा शपथविधी हे सोपस्कार तरी सुद्धा करावे लागतात.
शंकेचे कारणे नेमके समजल्यास नेमके उत्तर देणे सोपे जाईल. विकिपीडियावर कुणी चुकीचा कालावधी लिहावयास नको म्हणून कालावधी खूप प्रदिर्घ असल्यास क्रॉसचेक केलेले केव्हाही बरेच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४७, १६ जून २०१४ (IST)Reply

सदरील लेखामध्ये ४ वर्षाचा कार्यकाल असतो असे लिहिले आहे. त्यामुळे मी साशंक आहे . कारण इतरत्र अनेक ठिकाणी ५ वर्षे कार्यकाल सांगितला जातो. त्यामुळे शंका दूर होण्यासाठी मी हा प्रश्न विचारला. मी साशंक असल्याने बदल केला नाही. आपणास योग्य वाटेल ते करावे. उदय कुलकर्णी (चर्चा) १६:३५, १६ जून २०१४ (IST)Reply

सॉरी मी लेखाकडे गेलोच नव्हतो कारण एवढी सरळ सरळ त्रुटी मला अपेक्षीत नव्हती. निदर्शनास आणल्या बद्दल धन्यवाद. @Abhijitsathe: उदय कुलकर्णींनी निदर्शनास आणलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी असे सुचवावेसे वाटते. इंग्रजी विकिपीडियात ५ वर्षांच्या कालावधी सोबत दिलेली वाक्य योजना सयुक्तीक वाटते.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३८, १६ जून २०१४ (IST)Reply
"विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी" पानाकडे परत चला.