वाक्य बदल तपासावा

संपादन
  • हेमाडे संपादीत वाक्य : इंग्लिशमधील debate या शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून 'वाद' ही संज्ञा वापरली जाते. तथापि 'वाद' हा केवळ भाषांतरीत शब्द नाही. त्यास संस्कृत भाषेत विशिष्ट अर्थ आहे. तोच अर्थ इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.
  • 'ज' संपादीत वाक्य: वाद या संस्कृत शब्दाचे इंग्रजी भाषांतर debate किंवा discussion असे करण्यात येते. संस्कृत भाषेतील विशिष्ट अर्थ असलेला हा शब्द जवळपास त्याच अर्थाने इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.


दोन्ही वाक्यातून वेगळे अर्थ ध्वनीत होतात भारतीय भाषांमध्ये वाद या शब्दाचा संस्कृत अर्थ झिरपला आहे की इंग्रजी भाषेतून आलेला अर्थ झिरपला आहे या बाबत हि दोन्ही वाक्ये परस्पर विरोधी असावीत. असे वाटते अधिक सुयोग्य वाक्य कोणते ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२१, १४ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

अगदी योग्य शंका

संपादन
  • माहितगार, तुमचे निरीक्षण अचूक आहे. सर्वनाम ध्वनित होत नाही.
  • हे वाक्य असे हवे आहे : संस्कृत भाषेतील विशिष्ट अर्थ असलेला हा शब्द संस्कृत भाषेतील त्या विशिष्ट अर्थानेच इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.
  • आणि तसा बदल केला आहे.
  • 'ज' यांनी केलेल्या इतर बदलावर विचार करावा लागेल. जसे की रीत आणि रिती यात फरक आहे. रीत म्हणजे method आणि रिती म्हणजे methodology. मला येथे केवळ रीत अपेक्षित नसून रिती अपेक्षित आहे. दर्शन परंपरेने ती वादाची रिती म्हणून उपयोगात आणली. अनेकांपैकी एक रीत म्हणून नाही. पण लिखित नि:संदग्धीकरण केलेले बरे, घाई नको.
  • दुसरे म्हणजे तुम्ही विचारलेली द. गो. केतकर यांची माहिती मिळू पाहत आहे. मिळाली की पान निर्माण करता येईल.
  • धन्यवाद


श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:३०, १४ सप्टेंबर २०१५ (IST)Reply


वाद विरुद्ध Debate

संपादन

संस्कृत ही भाषा इंग्रजीच्या हजारो वर्षे आधी जन्माला आली. त्यामुळे वाद हा शब्द आधी निर्माण झाला आणि Debate हे त्याचे भाषांतर नंतर आले. त्यामुळे केलेला बदल सुयोग्य आहे..... ज (चर्चा) १४:०७, १४ सप्टेंबर २०१५ (IST)


>>रीत आणि रिती यात फरक आहे. रीत म्हणजे method आणि रिती म्हणजे methodology. मला येथे केवळ रीत अपेक्षित नसून रिती अपेक्षित आहे. दर्शन परंपरेने ती वादाची रिती म्हणून उपयोगात आणली. अनेकांपैकी एक रीत म्हणून नाही.<<

संस्कृतमध्ये रीति: हा शब्द आहे (ज.वि. ओकांच्या कोशानुसार हा शब्द रीती असाही लिहिता येतो असे दिसते. पण अन्य कोश तसे देत नाहीत.) मराठी लिहिताना रीतिः हा शब्द रीती असा लिहिला जातो. रिती असा शब्द ना मराठीत ना संस्कृतमध्ये. (दर्शनशास्त्रात असल्यास आधार शोधावा लागेल. दर्शनशास्त्र जर पाणिनीपूर्व असेल तर त्यातील शब्दांना पाणिनीचे नियम लागू असतीलच असे नाही.) रीतिःचे मराठी भाषांतर रीती किंवा रीत. दोन्ही शब्दांच्या अर्थांत फरक नाही. दोन्ही शब्दांना ’ने’ प्रत्यय लागून अनुक्रमे रीतीने आणि रितीने अशी रूपे होतात. मराठीत दोन्ही रूपे शुद्ध समजली जातात.

Methodology ही logy आहे, म्हणजे शास्त्र आहे. या शब्दाचे हिंदी आणि मराठी पर्यायी शब्द आहेत - अनुक्रमे प्रणालीशास्त्र अणि पद्धतिशास्त्र. रिती म्हणजे methodology असे कोठेच सापडले नाही.

त्यामुळे रीत आणि रीती हे शब्द निदान मराठीत, एकमेकांचे पर्यायी शब्द असले, तरी एकाऐवजी दुसरा वापरता येईलच असे नाही. (In any language no two words are interchangeable, असे सर्वमान्य सूत्र आहे.) रीतीला दर्शनशास्त्रात methodology असा खास अर्थ असल्यास तसे स्पष्ट करावे लागेल.... (चर्चा) १५:४४, १४ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

"वाद" पानाकडे परत चला.