चर्चा:लहुजी राघोजी साळवे
हा लेख भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८ अंतर्गत निर्माण केला/विस्तारल्या/संपादिल्या गेला आहे. |
इतरत्र सापडलेला मजकूर
संपादनक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. लहुजींचे वडील राघोजी पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.
लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते. फक्त त्या काळात दलितांना लिहिण्या-वाचण्याची बंदी असल्यामुळे लहुजी साळवे फक्त शालेय शिक्षणापासून वंचित राहिले होते.
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.
महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. नवोदित लेखकांनी, साहित्यिकांनी, जागृत समाजाने हे सत्य जाणून घेण्याची गरज आहे की, इतिहास दलित, आदिवासी, विमुक्त, भटके, ओबीसी, बहुजन समाजातील विद्वान, क्रांतिकारक शूरवीर मावळ्यांनीदेखील घडविला आहे. चंद्रकांत वानखेडे, खुशाल खडसे, दया हिवराळे, पद्मश्री नामदेव ढसाळ, दिगंबर घंटेवाड, प्रा. विठ्ठल भंडारे, अंकुश सिंदगीकर, राजेश खंडारे, नानासाहेब कठाळे, शिवराज दाढेल, प्रा. सुरेश दाभाडे, वि. भ. विटेकर, शंकर तडाखे, वसंत देसाई, प्रा. मा. म. देशमुख, विनोदकुमार बोरकर, प्रा. हरी नरके, प्रा. नरेश करडे, ऍड. एकनाथ आव्हाड आदींसहित त्या सर्व कवी, लेखक, साहित्यिकांचे ज्यांनी आपल्या लेखणीतून, साहित्यातून आद्य क्रांतिपिता लहुजी साळवे तसेच इतर उपेक्षित महापुरुषांचे कार्य समाजासमोर मांडले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
वरील मजकूरांतील आवश्यक तो भाग लेखात समाविष्ठ करावा. --संदेश हिवाळेचर्चा ००:३०, १९ जानेवारी २०२० (IST)