हा नेमका कोणता सिद्धांत? आयुर्वेदप्रणित रसायनांचा रससिद्धांत कि इतर कोणता? वि. नरसीकर (चर्चा) ०६:३०, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)

सॉरी पान तयारकरताना हे लक्षात आले नाही, किशोरीताई अमोणकरांच्या लेखात या शब्दाचा उल्लेख होता , हे पान नि:सदिग्धीकरणाकरिता वापरणे अधिक उचित असेल किंवा कसे ?माहितगार
रस या शब्दाचा अर्थ आयुर्वेदाच्या भूमिकेनुसार 'पारा' असा होतो. ज्या ज्या आयुर्वेदिक औषधाच्या नंतर 'रस' असा शब्द आहे त्यात पारा आहे असे समजावे. रससिद्धांत असा कुठला आयुर्वेदिक ग्रंथ आहे असे मला आठवत नाही. आभिजीत १९:२१, ११ जून २०१३ (IST)Reply

विश्वकोशीय मूल्य / प्रयोजन

संपादन

या लेखाचे विश्वकोशीय मूल्य / प्रयोजन काय आहे? काहीही माहिती उपलब्ध नसेल, तर हे पान काढून टाकावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:४५, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)

रससिद्धांतावर भारतीय साहित्यात (तसेच नाट्य आणि संगीत क्षेत्रात ) बरेच लिखाण झालेले आहे. (उदा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांचे 'समीक्षा आणि रससिद्धांत', भारतमुनींचे 'नाट्यशास्त्र', किशोरी आमोणकरांचे आत्मचरित्र इ.). आपल्या लेखक/संपादकवृंदात आजच्या घडीला या विषयांत कोणी जाणकार नसले तरी भविष्यात कोणीतरी 'रस' दाखवेलच :)

--दीप देवेंद्र नरसे ०४:३३, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)

चुकीचा मथळा

संपादन

मराठीतले सिद्धान्त, देहान्त, वेदान्त, शालान्त, कांडान्त, शोकान्त, जन्म, वाङ्मय, विषण्ण, अन्न, धम्म, निम्न, मृण्मयी वगैरे शब्द नासिक्य व्यंजनाऐवजी अनुस्वार वापरून लिहिता येत नाहीत; लिहिल्यास वेगळे अर्थ होण्याचा धोका असतो. तद्वतच, हंस, संयम, किंवा, संरक्षण, संहिता, संलग्न असले शब्द अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरून लिहिता येत नाहीत.

भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात रस, रसनिष्पत्ती, रससूत्र, रसास्वाद, रसप्रक्रिया, रसविघ्ने, रसग्रहण, रसध्वनी वगैरे गोष्टींचा सांगोपांग विचार केला आहे. आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त यांनी रसाभासाची कल्पना मांडली. काव्यशास्त्रातल्या या प्रकाराला रससिद्धान्त असे म्हणतात. --J १९:५८, १ मार्च २०११ (UTC)

याचे नाव 'भारतिय काव्यशास्त्रातील नौरस'/नऊ रस असे असावयास हरकत नाही.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:००, १२ जून २०१३ (IST)Reply


नवीन पिढीला रस शब्द इथे का हा प्रश्न तरीही पडेल का ? माहित नाही :) एनी वे सुचना चांगली आहे. मराठी विश्वकोशात रस सिद्धांत असे शीर्षक लेखन आहे त्यांच्या लेखात चार पाने मककुर दिसतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:११, १२ जून २०१३ (IST)Reply

मग याचे नाव 'भारतिय काव्यशास्त्रातील रस सिद्धांत' असे करा की.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:३९, १२ जून २०१३ (IST)Reply

रस सिद्धांत असे कुठल्या ग्रंथाचे / पुस्तकाचे नाव आहे असे मला आठवत नाहीये पण याचा अर्थ ते अस्तित्वात नाही असा निष्कर्ष काढण्यापूर्वी मी काही तज्ञ लोकाना विचारतो आणि मग सांगतो. धन्यवाद. आभिजीत १७:५१, १२ जून २०१३ (IST)Reply
पुढील ३ - ४ दिवसात मी ही माहिती काढतो. तोपर्यंत मी माहिती देऊ न शकल्यास शीर्षक बदलावे. धन्यवाद. आभिजीत १७:५३, १२ जून २०१३ (IST)Reply

आयुर्वेदातील रसशास्त्र

संपादन

आयुर्वेदात, बौद्ध काळात जन्मलेले आणि नागार्जुनाने पुढे आणलेले ’रसशास्त्र’ आहे, रससिद्धान्त नसावा. ’ते’ रसशास्त्र पारा आणि अन्य धातू, रत्ने, विषे आणि काही अन्य वनस्पती यांचे ’शोधन’ करून औषधे बनविण्याचे शास्त्र आहे.

"रससिद्धान्त" पानाकडे परत चला.