चर्चा:रवींद्र दिनकर बापट
साहजिकच, रवी बापट यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणच्या सात शाळांत झाले. पाथ्रीकर गुरुजींनी त्यांचा पहिली-दुसरीचा अभ्यास मध्य प्रांतातील बालाघाट येथे घरीच करवून घेतला. नंतर तिसरीमध्ये ते पुण्यातील बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत होते. ५वीत भावे स्कूल, ६वीत अमरावतीला, ७वीत वाशीमला बक्षी सरांच्या शाळेत, आणि ८वीत हिंदी माध्यमात ते छिंदवाडा येथील शाळेत शिकले. आठवी सरतासरता ते जगदलपूरला आले. शेवटी दहावी-अकरावीसाठी ते परत बालाघाटला आले. म्हणजे ८वी ते ११वीचे त्यांचे शिक्षण मध्य प्रांतात हिंदी माध्यमातून झाले. बालाघाटला असताना त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली व ते जिल्ह्यामध्ये पहिले आले. अकरावीनंतर मात्र रवी बापट मुंबईत मावशीकडे रहायला आले.
वरिल वाक्य आत्मचरित्राच्या द्रुष्टीने उचित वाटतात, विकि वर हि वाक्ये वगळावीत असे माझे मत आहे.
--विकिकरण (चर्चा) ००:०२, २ ऑगस्ट २०१३ (IST)
वरील परिच्छेदातील सुरुवातीचा ’साहजिकच’ ही एकच शब्द विकिलायक नाही, बाकीच्यात मला काही अयोग्य वाटत नाही.. आणि हे आत्मचरित्र नाही, तर चरित्र आहे. रवींद्र बापट यांच्या चरित्रात त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीतले थोडे तपशील आले तर हरकत काय? नाहीतर हे सगळे गाळून टाकावे आणि ’ते जन्मले आणि अजून हयात आहेत’ एवढेच वाक्य ठेवावे.....J (चर्चा) ००:४०, २ ऑगस्ट २०१३ (IST)
कदाचीत वर्ग तिसरा , घटक चाचणी पहिली बाबत उल्लेख आला असता तर तेव्हा तुम्हाला वरील परिच्छेद विकिलायक वाटला नसता.
इयत्ता पहिली ते दहावी पर्य्ंत शाळांची माहिती स्ंदर्भा रहित केवळ आत्मचरित्रा असु शकते विकिवरील चरित्र लेखात नाही.
--विकिकरण (चर्चा) ०२:०८, २ ऑगस्ट २०१३ (IST)
विकिवर लेख कसे असावेत ह्या साठी खालील ओळ वाचावी,
त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..