चर्चा:युरोपीय प्रबोधनाचा काळ
माझ्या मते रिनैसाँचा अर्थ प्रबोधनपेक्षा नूतनीकरण, आमूलाग्र बदल, जुने झटकून देउन नवीन अंगिकारणे असा काहीसा होईल. नेमका मराठी शब्द आत्ता सुचत नाही.
अभय नातू ०२:११, ४ एप्रिल २०११ (UTC)
- http://www.manogat.com/pari/search/Renaissance/0 मनोगतावर उपलब्ध विश्वकोश शोधात] वेगवेगळे शब्द दिले आहेत. बालभारतीत कोणता शब्द वापरला होता ते आता आठवत नाही सुयोग्य शब्द सुचवावा त्या प्रमाणे बदल करता येईल माहितगार ०२:१८, ४ एप्रिल २०११ (UTC)
- मराठी माध्यमाच्या इतिहास पुस्तकात मी नववीत असताना आम्हांला दा विंची, गुटेनबर्ग इत्यादी मंडळींच्या कालखंडाचा इतिहास होता; त्यात प्रबोधन असा शब्द रेनेसाँसाठी वापरला होता. त्याचप्रमाणे युरोपियन रेनेसाँ', 'इंडियन रेनेसाँ' या संज्ञांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यक्रमांत 'युरोपीय प्रबोधन', 'भारतीय प्रबोधन' अश्या संज्ञा वापरल्या होत्या.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:१७, ४ एप्रिल २०११ (UTC)
- शब्दश: 'पुनरुज्जीवन' हा शब्द कदाचित अधीक जवळचा असावा पण शालेय शिक्षणात आणि इतरत्र प्रबोधन हा शब्द अधिक प्रचलीत असण्याची शक्यता वाटते अजून काही मते मांडली जातात का पहावे .
- इतरत्र जेंनी मुद्दा मांडला तसा पुनरुज्जीवन शब्दासोबत कर्म-कर्ता इत्यादी टाळण्याच्या दृष्टीने प्रबोधन शब्द प्रचलित असल्यास कल्पना नाही.कारण पुनरुज्जीवन तर मग कशाचे पुनरुज्जीवन ? असा पायात चप्पल का? चपलेत पाय वाला मुद्दा उपस्थित होऊ शकतो
माहितगार १४:२३, ४ एप्रिल २०११ (UTC)
- अरे वा वा चक्क महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ मिळाले आणि सोबत सुयोग्य शब्दाची माहितीही ती अशी "रेनेसॉं म्हणजे नवजीवन किंवा पुनरुत्थानाचा काळ (इ. स. १४५३ ते १६९०) , प्रबोधनाचा किंवा एन्लायटन्मेंट काळ (इ. स. १६९० ते १७८१) जर्मन तत्त्वज्ञान (इ. स. १७८१ ते १८३१) आणि नंतर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील एकूण ५०० वर्षात लिओनार्दो द विंची, ब्रुनो, कोपर्निकस, केप्लर, गॅलिलिओ, फ्रॅन्सिस बेकन आणि पुढे देकार्त, स्पिनोझा, लॉक, ह्युम, रुसो, कान्ट, हेगेल, मार्क्स, रसेल अशी एक तत्त्वज्ञांची प्रदीर्घ मालिकाच तयार झाली."
- मला वाटते वरील उल्लेखानुसार सुयोग्य शीर्षक लेखन करण्यास हरकत नसावी माहितगार ०९:४५, ९ एप्रिल २०११ (UTC)
Start a discussion about युरोपीय प्रबोधनाचा काळ
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve युरोपीय प्रबोधनाचा काळ.