चर्चा:मृदुला बेळे
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Mahitgar
हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
मृदुला बेळे यांच्या २ जुलै २०१५च्या लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार -
अमेरिकन पेटंट लॉ अन्वये एखाद्याच्या कवितेच्या ओळी त्याच्या परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय अन्यत्र (अगदी पोस्टाच्या तिकिटावरसुद्धा!) छापल्या तर त्यात आर्थिक बाबी उद्भवत नसल्याने, तो गुन्हा होत नाही. म्हणजेच कुणीही काढलेला फोटो किंवा कोणाच्याही लेखातील अवतरण जर दुसर्याने छापले, आणि त्यात कुणाचाही आर्थिक लाभ किंवा नुकसान होत नसेल, तर असे छापणे हा प्रताधिकार कायद्याचा भंग होत नाही. ... ज (चर्चा) २३:५४, ३ जुलै २०१५ (IST)
- प्रथम दर्शनी, लेखिका मृदुला बेळे यांच्या कथा अकलेच्या कायद्याची: फक्त 'कलाकार' म्हणा!" ह्या लेखाचा उद्देश भारतीय कायद्यास अनुसरून मूळ लेखकाचे श्रेय आणि संदर्भ नोंदवण्याची सजगता निर्माण करणे असावा असे वाटते. मराठी विकिपीडियावर लिहिताना भारत देशाचेही कायदे लागू होतील किंवा कसे हे लक्षात न घेता अर्थ सोईने तर घेतला जात नाही आहे ना अशी साशंकता वाटते.