तमिळमध्ये 'श' नाही. तमिळ लिपीत संस्कृत लिहिण्यासाठी ज,स,ष, ह आणि क्ष ही ग्रंथ अक्षरे निर्माण करावी लागली. त्यातही 'श' नाही. संस्कृत श्री तमिळमध्ये Sri होते, शुभलक्ष्मी Subbalakshmi. महेश Mahes. तमिळ सोडून इतर सर्व भारतीय भाषांच्या लिपींमध्ये हे नाव 'महेश' असेच लिहिले जाते.

इंग्रजी 'oo' म्हणजे प्रत्येक वेळा दीर्घ ऊ-कार होत नाही. Good, took, look, foot, hood, hook, wool/woolen, book, nook, soot, gooseberry इत्यादी शब्दात 'oo' असून उच्चारात दीर्घ ऊ-कार नाही. त्यामुळे Goonatilleke चे मराठी व इतर भारतीय लिपींमध्ये गुणतिलके असेच लिखाण होईल. याशिवाय 'oo' चे काही इतर उच्चार:- बुअर, पुअर, डोअर, फ़्लोअर, फ़्लड्‌, ब्लड्‌. J--J १७:२३, २१ मे २००७ (UTC)

मलादेखील 'जे' यांनी म्हटल्याप्रमाणे 'oo' चा उच्चार 'उ' (र्‍हस्व उकार) असा होईल असे वाटते.
--संकल्प द्रविड १७:३३, २१ मे २००७ (UTC)

महेस/महेशचे नाव सिंहली भाषेत आहे, तमिळ नाही. सिंहली भाषेत श (sh वापरुन लिहिलेला) आहे. हशन तिलकरत्ने, निरोशन बंदरतिलके, अशांत डिमेल, इ. आपल्या नावाचे इंग्लिश शुद्धलेखन sh वापरून करतात (पहा - इंग्लिश विकिपीडियावरील श्रीलंकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची सूची)

आपण दिलेले ooचे उच्चार इंग्लिश भाषेतील शब्दांचे आहेत. सिंहली भाषेला ते उच्चार नियम लावणे बरोबर नाही, कारण येथे सिंहली ही स्रोत भाषा आहे. सिंहली भाषेत र्‍हस्व व दीर्घ उकार हे वेगळे आहेत. महेस/महेश गूणतिलके व योहान गूणशेखर/गूणसेकरने आपल्या नावात दोन o वापरले आहेत तर अविश्क गुणवर्दने, रोशन गुणरत्ने व असांका/अशांका गुरुसिंहाने u वापरले आहेत. असे दोन वेगळ्या प्रकारे शुद्धलेखन असण्यामागे उच्चारभिन्नता नक्कीच असणार.

जर कोठे महेस/महेश गूणतिलकेच्या नावाचे IPA उच्चारण मिळाल्यास येथे उद्धृत करावे व त्याप्रमाणे लेखात बदल करावेत.

अभय नातू १८:४१, २१ मे २००७ (UTC)


महेश गुणटिळके सिलोनमध्ये कॅन्डीच्या ज्या सेन्ट अँथनीज़ कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजच्या संकेतस्थळावर त्याचे कॉलेजातील नाव Mahesh Gunatilake असे दिले आहे. पहा: http://www.antonian.lk/uned/sports/cricket2.htm पुढे त्याने Gonatilleke हे ख्रिश्चन स्पेलिंग घेतले असावे.जसे गोव्यातले हिंदु व ख्रिश्चन आपाआपल्या त्याच आडनावाचे वेगळे स्पेलिंग करतात तसा काहीसा हा प्रकार असावा. अर्थात मला महेशचा धर्म माहीत नाही. मी फक्त स्पेलिंगबद्दल मत व्यक्त करीत आहे.--J- J १८:५०, २९ मे २००७ (UTC)

आपण दिलेल्या दुव्यावर टिचकी मारता हे पान अस्तित्त्वात नाही असा संदश येत आहे. तेथील इतर पानांवर महेस/श मला सापडला नाही, पण इतर Goon सापडले, जसे Wijegoonewardene, Goonewardena. :-)
अभय नातू १९:२६, २९ मे २००७ (UTC)
ता.क. दुव्याशी थोडी झटापट केल्यावर महेस/शचा उल्लेख सापडला. क्रिकइन्फोवरील पानावर त्याचे नाव महेस आहे...क्रिकइन्फोही बर्‍यापैकी विश्वसनीय संदर्भस्थान आहे...तिढा कायम... :-)
अभय नातू १९:३०, २९ मे २००७ (UTC)

अभय नातू,

मी दुवा नीट केला आहे. स्वतः उघडून पाहिला. त्या कॉलेजमध्ये दोन गुणटिळक आहेत. दुवा उघडून editला जाऊन find Gunatilake करा. सापडेल.

मला महेशखेरीज अनेक Goonatilleke/Goonetilleke/Gunatillake मिळाले. डबल ओ करणारे सर्व ख्रिश्चन होते. महेशने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल किंवा ज्या पत्रकाराने त्याला प्रसिद्धी दिली तो ख्रिश्चन असेल. त्या काळात Goonatilleke नावाच्या वरच्या दर्ज्याच्या श्रीलंकन पोलिस ऑफ़िसरवर इंग्लंडमध्ये shop lifting साठी खटला भरला होता. खटला अतिशय गाजला होता. त्यामुळे पत्रकाराने चूक केली असेल.--J--J ०६:४६, ३० मे २००७ (UTC)

महेस/शने शेवटचे जे नाव स्वीकारले असेल (गूणतिलके,) त्या नावाचे पान ठेवून दुसर्‍या नावाचे (गुणतिलके/गुणटिळके) पुनर्निर्देशन करावे. आपले यावर मत?
अभय नातू ०७:१३, ३० मे २००७ (UTC)

ज्या कॉलेजमध्ये महेश शिकला त्या कॉलेजातील नाव खरे. आपण कॉलेजच्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घेतली असेल, नसेल तर मी त्यातील निवडक उतारा नक्कल करून पाठवीन. महेशने स्पेलिंग बदलले तरी उच्चार बदलला नसणार. उच्चार महेश गुणटिळक असाच असणार. पण तो कसा उच्चार करतो ते शोधणे फार अवघड! ख्रिश्चन स्पेलिंग असे का याची कारणे सांगता येतील. इंग्लिशमन हिंदुस्थानात आले तेव्हा अधिकारी सोडून इतरांना त्यांच्या बायका आणता आल्या नाहीत. अनेक सैनिक व कारकून मंडळींनी हिंदुस्थानी स्त्रियांशी लग्ने केली. त्यांची प्रजा Anglo-Indians. त्यांची पितृभाषा इंग्रजी. त्यामुळे नावांची स्पेलिंग्ज इंग्रजीप्रमाणे. गुणटिळकच्या स्पेलिंगमध्ये Gun/Guna चालणार नाही, कारण उच्चार इंग्रजी उच्चार पद्धतीनुसार गन्‌/ग्यूना होणार. पुणं/पुणे चे स्पेलिंग Puna/Pune केले तर प्यूना/प्यून होणार. त्यामुळे ते pooनेच करायला पाहिजे. कुन्नूरचे coonnoor; cunnoor नाही. कारण मग ते कन्नूर होईल. गुंडाराज चे स्पेलिंग Goondaraj. Gundaraj केले तर गंडाराज होईल. Goonetilleke मध्ये तीन 'ई' आल्या आहेत. त्यांचा उच्चार Schwa(sheva) करायचा. अभयमधला दुसर्‍या 'ए' चा उच्चार schwa(म्हणजे दीर्घ अ). श्वा करिता 'ए'पेक्षा 'ई' खात्रीचा(सेफ). उच्चार 'आ' होण्याची भीती नाही व 'ए' होण्याची शक्यता कमी. LL म्हणजे ळ. एवंच इंग्लिशमनचा Goonatilleke म्हणजे मराठी गुणटिळक.--J--J १५:४६, ३० मे २००७ (UTC)

उतारा मला आधीच मिळाला होता (मी ता.क.मध्ये नमूद केल्या प्रमाणे)
ज्या कॉलेजमध्ये महेश शिकला त्या कॉलेजातील नाव खरे. -- सहमत नाही. जे नाव त्याने स्वतः (conciously and conscientiously) घेतले/बदलले ते नाकारणारे आपण कोण?
महेस/शने नाव बदलले हे खरे का? जसे क्रिकइन्फो व इतर क्रिकेटशी संबंधित सगळी संदर्भस्थळे चुकुन गूनतिलके वापरत असतील तसे महेस/शच्या कॉलेजचे संकेतस्थळ तयार करणाराही चुकू शकतो?! अर्थात हे सगळे जर-तारीच आहे (conjectures). खरी परिस्थिती काय ते महेस/शच जाणे.
आपण दिलेली एतद्देशीय-इंग्लिश शुद्धलेखनाची कारणमीमांसा बरोबर आहे, त्यात शंका नाही, पण इंग्रजांनी जे (शेकडो वर्षांपूर्वी) केले ते महेस/शने करावे (किंवा केले असणार) हे गृहित धरणे बरोबर नाही.
असो. सद्यपरिस्थितीत ठोस पुरावा हाती आल्याशिवाय बदल करु नये (पुनर्निर्देशन जरुर तयार करावे) असे मला वाटते. मी माझ्या श्रीलंकन मित्रांचे मत घेउन येथे कळवतो.
अभय नातू १६:१०, ३० मे २००७ (UTC)
श्रीलंकन मित्रांचे मत घेणे सर्वात योग्य ठरेल. कमीतकमी तीन मित्रांचा सल्ला घेणे चांगले, म्हणजे चूक होण्याची शक्यता कमी. आपण म्हणता तसे महेशने नाव बदलले नाही, फक्त स्पेलिंग! 'मुळे' आड्नावाचे स्पेलिंग Muley करतात, ओक OakOke करतात म्यूल किंवा ऑक्‌ व्हायला नको. मराठी वर्तमानपत्रात छापतात तसे 'गुणतिलके' स्वीकारून लेख पुनर्निर्देशित करून भागेल असे वाटते.--J--J १६:२८, ३० मे २००७ (UTC)

Start a discussion about महेस गूणतिलके

Start a discussion
"महेस गूणतिलके" पानाकडे परत चला.