हे पान मल्लिकार्जुनवरून येथे का आणले? श्रीशैल्य हे आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्हयातल्या एका डोंगराचे नाव आहे असे मला वाटते. मल्लिकार्जुन आणि सोरठी सोमनाथाचे अपवाद वगळता इतर ज्योतिर्लिंगाच्या नावात स्थळाचे उल्लेख नाहीत, मग या दोघांचा अपवाद का?...J १८:४१, २९ जुलै २०११ (UTC)

काही हरकत नाही नाव बदल करावा यास अनुमोदन आहे निनाद २२:३९, २९ जुलै २०११ (UTC)

या लेखात खरोखरच इतक्या सार्या साचांची आवशकता आहे का ? हिंदू धर्मातील सोळा संस्कार पासून भारतीय महिने आणि हिंदू काल गणना पर्यत ? मला असे वाटते कि संदर्भितच साचे द्यावे आणि अनावश्यक साच्यांना येथून फाटा द्यावा. तीच तीच माहिती फिरून फिरून अनेक लेखात सम्बंध नसतांना देण्याचे काय अव्चीत्य. राहुल देशमुख १८:५४, २९ जुलै २०११ (UTC)

तसे एकमेकांशी फारसा सबंध नसणारे साचे पानावरून काढले पाहिजेत. पण त्यातील लेख हे दुर्लक्षित आहेत/होते. काही काळ हे साचे नजरेसमोर राहिले तर भर घालणे होत राहील. यथावकाश त्यात मजकूर आल्यावर, त्यांना तेथून काढावे ही मी विनंती करेनच. सध्या हिंदू धर्म विषयक पाने एकत्र दिसावीत असा प्रयत्न आहे म्हणून साचे बनवून सर्वत्र टाकत आहे. कळावे निनाद २२:३९, २९ जुलै २०११ (UTC)
"मल्लिकार्जुन" पानाकडे परत चला.