चर्चा:मनाचे श्लोक

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

पूर्वी मनाचे श्लोक विकिपीडिया वर, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन पानांवर दोन्ही मिळून, फक्त १४० च उपलब्ध होते. आता सर्व २०५ श्लोक उपलब्ध आहेत व ते सर्व एकाच पानावर घेतलेले आहेत.

  • मनाचे श्लोक हे विकिपीडियात असावे कि विकीस्त्रोत अथवा विकीकोट्स मध्ये हलवावेत - मेघनाथ ०९:०१, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • विकीस्त्रोत मध्ये. तसेच या पानावर जुजुबी माहिती टाकून विकीस्त्रोत वरील दुवा देता येईल.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:२४, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

इतर पानावरून

संपादन
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥


विवेचन :-

मानवी मनाला चिरंतनाचा बोध करणाऱ्या आपल्‍या ’मनाच्‍या श्‍लोकां’ची सुरुवात समर्थ रामदासस्वामींनी सकल कला आणि विद्येचा दाता श्रीगणेश आणि अधिष्‍ठात्री देवता शारदेला वंदन करून केली आहे. हिंदू संस्‍कृतीप्रमाणे हे मंगलाचरण आहे. सकल इंद्रियांचा आणि गुणांचा स्‍वामी अशा परमेश्‍वराला, श्रीगणेशाला ते प्रथम वंदन करतात. अद्वैत तत्‍त्‍वज्ञानाचा विशेष असा की, सकल द्वैताचा त्‍याग करून शिल्‍लक राहणारे परमतत्‍त्‍व म्‍हणजेच एकमात्र परमेश्‍वर मानला जातो. असा परमेश्‍वर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु त्‍याला जाणून घेण्‍यासाठी सामान्‍य माणसाने सगुणोपासनेपासून सुरुवात करावी. जसे एखादे लहान मूल सुरुवातीला चालता यावे यासाठी पांगुळगाडा घेते व नंतर चालता येऊ लागले की पांगुळगाडा सोडून देते, तद्वत नंतर सगुण सोडून निर्गुणोपासनेचीच कास धरायची असते. श्रीगणेशाला ओंकार स्‍वरूप मानले आहे. ओंकार म्‍हणजे साक्षात परमतत्‍त्‍वाचाच ध्वनी होय. म्‍हणून श्रीगणेशाची उपासना म्‍हणजे निर्गुण आणि निराकार अशा परमेश्‍वराकडे जाण्‍याच्‍या अध्‍ययनाची सुरुवात आहे.

परा, पश्‍यंती, मध्‍यमा आणि वैखरी या चार वाणी म्‍हणजे सामर्थ्‍यांचे म्‍हणजेच शक्‍तीचे प्रतीक आहेत. विद्या आणि सामर्थ्‍य ही दोन्‍ही परमार्थमार्ग क्रमण्‍यासाठी आवश्‍यक आहेत. अर्थात श्रीसमर्थ रामदासस्वामींना अभिप्रेत असलेले हे केवळ शरीराचे नसून मनाचे सामर्थ्‍य म्‍हणजेच मनोबल आहे. या सामर्थ्‍याची आदिदेवता आदिशक्‍ती शारदा तिलाही समर्थ वंदन करतात. म्‍हणजेच बुद्धी आणि शक्‍ती या दोघांच्‍याही संयोगातूनच मनोबल प्राप्‍त करून घेऊन साधकाने अनंत अशा परमेश्‍वराची प्राप्‍ती करून घेण्‍याचा मार्ग क्रमावयाचा आहे. समर्थांच्‍या ’मनाच्‍या श्‍लोका’त येणारा राघव म्‍हणजे केवळ मर्यादित अर्थाचा ‘दाशरथी राम’ नाही. हा राघव म्‍हणजेच निर्गुण निराकार असा परमात्‍मा आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्रीराम जय राम जयजयराम ।।

"मनाचे श्लोक" पानाकडे परत चला.