शीर्षक संपादन

काही व्यक्तीं या त्यांचे जन्म नावापेक्षा टोपण नावाने अधिक प्रसिद्ध आहेत जसे नाना पाटेकर. आमदार बच्चू कडू हे ही याच प्रकारातले आहेत. स्थानिक व राज्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या या नावानेच प्रसिद्ध आहेत. म्हणुन बच्चू कडू हे लेखाचे नाव संयुक्तीक ठरते व विकिपिडीया धोरणारुप आहे.

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानांबद्दल अभिनंदन.
सोबतच नाना पाटेकर शीर्षकाबद्दल कल्पना देण्याबद्दल धन्यवाद. आता त्याचे स्थानांतरण पूर्ण लेख नावाकडे केले आहे. मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसरून शीर्षके पूर्ण मूळ नावाने असणे अभिप्रेत आहे. या विषयावर मागे इतरत्र दिलेला दीर्घ प्रतिसाद थोड्यावेळाने आपल्या माहिती साठी उपलब्ध करेन.
आपल्या आवडीचे वाचन लेखन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५१, १७ डिसेंबर २०१३ (IST)Reply

व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत संपादन

विकिपीडिया वर नवीन पान तयार करताना त्याचे शीर्षक कसे असावे या साठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतविकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत वाचावे.

  • व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये. [अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)].
  • व्यक्तीस विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे म्हणूनच विकिपीडिया ज्ञानकोशात लेख असतो. ज्ञानकोशाच्या वाचकास विशेषण पदव्यांनी संपादकाची आणि ज्ञानकोशाचा सॉफ्ट कॉर्नर आहे असे वाटल्यास अथवा निष्पक्षता बाधीत होते आहे असे वाटल्यास विशेषण पदव्यांचा ज्ञानकोशाची विश्वासार्हता बाधीत होण्या पलिकडे काहीही फायदा होत नाही. ज्ञानकोशाचे काम वस्तुनिष्ठ माहिती देण्यापर्यंत मर्यादीत आहे. व्यक्तीत्वे स्वकतृत्वावर अवलंबून असतात. त्यांच्या कतृत्वा/कार्याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती वाचल्या नंतर वाचकाच्या मनात आपोआप सुयोग्य जागा निर्माण होते. त्याकरता ज्ञानकोशाच्या संपादकांनी आपले सॉफ्ट कॉर्नर त्यात मिसळण्याबद्दल विचार करण्याचा मोह टाळलेला बरा
  • अजून एक महत्वाची बाजू, नवीन येणाऱ्या सदस्य वाचकांना/संपादकांना सर्वसामान्य इतर लेखन क्षेत्रांपेक्षा ज्ञानकोशीय परीघ वेगळा आहे आणि त्यास मर्यादा आहेत याची ओळख लेख वाचताना सुरवाती पासून राहील्यास. पुढे नवागत संपादक लेखन चालू करतात तेव्हा त्यांना येथे निष्पक्षतेच्या आणि विवीध ज्ञानकोशीय मुल्यांचे भान सातत्याने रहाण्यास मदत होते म्हणूनही उपरोक्त शीर्षकलेखन संकेत होता होईतो पाळले जाणे गरजेचे असते.

प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी. जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा.

अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.

  • विकिपीडिया ज्ञानकोशात व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना मूळ लेखपानाचे शीर्षकात अद्याक्षरे टाळावीत, त्यांच्या संपूर्ण नावाने शीर्षक ठेवावे असा लेखन संकेत आहे.
  • उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.खालील सर्वच प्रकार शीर्षकात टाळावे:
श्री./सौ/डॉ./प्रा/प्रो/ॲडव्हो/नामदार/सर/क्रांति(वीर|सिंह)/महात्मा /(लोक|महा)(नायक|मान्य|नेते) /शाहीर /सेनापती /स्वातंत्र्यवीर /सम्राट /छत्रपती /महाराज /स्वा(मि|मी) /गु(रु|रू) / स्वा(मि|मी) | गु(रु|रू)|संत /सेंट /ऋषी /(गोसावी|फकीर|हजरत|धर्माचार्य||महामंडलेश्वर|योगी) / बा(बा|पू)|(फादर|पोप) /भारतरत्न /पद्म(श्री|भूषण|विभूषण) /(नाम|आम|खास)दार /सेवक|कैवारी
  • अपवाद विशेषनामात समावेश.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५७, १७ डिसेंबर २०१३ (IST)Reply
"बच्चू कडू" पानाकडे परत चला.