en:Lambadi

स्वतंत्र लेख असावे

संपादन

देशभरात बंजारा भाषा म्हणूनच ओळख आहे. बंजारा भाषेलाच गोरमाटी म्हणून संबोधन करतात. लमाणी बोली म्हणून उल्लेख होत नाही. (अधिक माहितीसाठी : हिंगोली लोकसभा क्षेत्राचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत केलेली मागणी व प्रश्न अभ्यासा. बंजारा भाषेवर अनेक शोधप्रबंध प्रसिद्ध आहेत. समाजातील भाषा व संस्कृती अभ्यासकांनी 'बंजारा/गोरमाटी' म्हणूनच व्यवहारात व साहित्यात उल्लेख केल्याचे दिसते) Govr1 (चर्चा) ०६:५१, २२ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

ठीक आहे, मग या लेखाचे नाव बदलुया. नक्की काय ठेवावे. गोरमाटी भाषा, गोरमाटी बोली, बंजारा भाषा, बंजारा बोली, का अजून दुसरे अधिकृत नाव? - संतोष गोरे ( 💬 ) ०६:५७, २२ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

बंजारा भाषा उचित राहिल. कारण केंद्र सरकारच्या प्रेस रजिस्ट्रेशनच्या RNI यादीत बंजारा भाषा म्हणून उल्लेख आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तकात 'गोरमाटी' म्हणून उल्लेख आलेला आहे. महाराष्ट्रात बंजारा समाज स्वतः 'गोर' (Gour Banjara गौर बंजारा) म्हणून संबोधतो व परिचय देतो. परंतु उत्तर-मध्य भारतात व दक्षिण भारतात (पंजाब ,महाराष्ट्र वगळता) 'बंजारा' म्हणूनच अधिकतेने ओळखला जातो.व तसा परिचय देतात.बंजारा भाषा म्हणून उल्लेख उल्लेख होतो. बंजारा भाषेला संविधानाच्या आठव्या सुचीत समावेश करून भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस देखील केलेली आहे. Govr1 (चर्चा) १७:२३, २२ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply


@Govr1:   झाले.. कृपया लक्षात घ्यावे, विकिपीडियावर तुम्ही, मी अथवा इतर कुणीही लेख लिहिणारी व्यक्ती ही पगारी नसते. इथे सर्वजण वेळ काढून संपादने करत असतो. तसेच त्या व्यक्ती कडे पुस्तके किंवा ग्रंथालय उपलब्ध असेल असे नाही. तेव्हा अधिक माहितीसाठी अमुक ग्रंथ वाचा असे म्हणून उपयोग होणार नाही. त्यासाठी स्वतःचा मुद्दा मांडताना एखाद्या संकेतस्थळाचा दुवा पेस्ट करावा. जेणेकरून एकमेकांना पूरक माहिती आणि संदर्भ देता येतील.

तसेच कृपया लक्षात घ्यावे, एखाद्या पानावर लिखाण करताना मध्यम आकाराच्या परिच्छेदात लिखाण करावे आणि प्रत्येक परिच्छेदाला योग्य तो दुवा द्यावा. - संतोष गोरे ( 💬 ) २२:४९, २४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

धन्यवाद... Govr1 (चर्चा) १०:३४, २५ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

परिच्छेद लेखनासाठी आवश्यक टॅब बाबत

संपादन

लेखाची मांडणी दर्जेदार व्हावी, यासाठी परिच्छेद लेखन करीता काही आवश्यक टैब किंवा काॅलम देण्यात यावे. किंवा तशी सुधारणा करण्यास सहकार्य करावे. Govr1 (चर्चा) ०९:४७, २६ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

"बंजारा भाषा" पानाकडे परत चला.