चर्चा:पोलंड
पोलिश उच्चार
संपादनखालील पोलिश शब्दांचे उच्चार इंग्लिश विकिपीडियावर ऐकले आणि ऐकण्यानुसार लिहिले आहेत:-
- लेख काटिन्स्की (Lech Kaczyński)
- यारोस्वाख काटिन्स्की (Jarosław Kaczyński)
- पोलिश झुवॉटी (Polish złoty)
ते उच्चार देवनागरीत बरोबर लिप्यंतरित झाले आहेत किंवा नाही याची कोणी खातरजमा करू शकेल का?
तसेच पोलंडच्या राजधानी Warsaw चा पोलिश भाषेतील उच्चार इंग्लिश विकिपीडियावरील त्या पानावर 'वर्शावा' असा ऐकू येतो; पण टेबलातील 'राजधानी'च्या रकान्यात 'वॉर्सो' असा शब्द लिहिला आहे. तरी तेथे 'वर्शावा' असाच शब्द लिहावा का?(मला तरी मूळ भाषेतील उच्चाराला प्राधान्य द्यावे असे वाटते. 'वॉर्सो' हा शब्द redirection entry म्हणून ठेवावा असे वाटते.)
संकल्प द्रविड 18:05, 16 ऑगस्ट 2006 (UTC)