इंग्रजीत Digestive system हे दोन वेगवेगळे शब्द आहेत.त्याचे पचन संस्था असे रुप मला बरोबर वाटते. पचनसंस्था असे एकत्र कां? कृपया खुलासा करु शकाल काय?तेवढेच माझे विचार स्पष्ट होतील. वि. नरसीकर (चर्चा) १६:१६, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)

'पचनासाठी असलेली संस्था' या अर्थाचा हा तत्पुरुष समास (माझ्या माहितीप्रमाणे 'संप्रदान तत्पुरुष' या उपप्रकारातला) आहे. सामासिक शब्दांचे लेखन सहसा सलग केले जाते, त्यामुळे 'पचनसंस्था' हे लेखन योग्य होय (अपवादात्मक परिस्थितीत सामासिक शब्दातून संदिग्ध अर्थबोध घडत असल्यास किंवा सामासिक शब्द लांबीला खूप मोठा होत असल्यास, त्यातील घटक शब्द वेगवेगळे लिहिले जाऊ शकतात.).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:२६, १६ फेब्रुवारी २०१० (UTC)

नोंद घेतली. धन्यवाद. 117.198.90.65 १३:३५, १६ फेब्रुवारी २०१० (UTC)

Start a discussion about पित्ताशय

Start a discussion
"पित्ताशय" पानाकडे परत चला.