चर्चा:परेश रावळ
रावळ की रावल
संपादन- अनामिक सदस्यांनी परेश रावळ नावातील आडनावाचे रावळ एवजी रावल करण्याचा प्रयत्न केला आहे.गूगल मराठी शोधातून मराठी वृत्तमाध्यमे परेश रावळ असेच लिहित आहेत. व रावळ वयाच्या २२व्यावर्षीपर्यंत गुजराथ मध्ये होते असा स्पष्ट उल्लेख त्याशिवाय इंग्रजी विकिपीडियातील गुजराथी लेखनात ल चा नव्हे ळचा उल्लेख आहेच त्या शिवाय गुजराथी गुगल सर्च मध्ये शिवाय गुजराथी ळ आणि गुजराथी ळनेच सामान्यरूपे झालेली दिसतात तेव्हा रावळ हाच उच्चार अधिक सुयोग्य वाटतो.माहितगार १०:४२, १८ डिसेंबर २००९ (UTC)
गुजरातीमध्ये रावळ असे शुद्धलेखन आहे. राजस्थानी रावळ कधीकधी रावल लावतात पण सहसा तेथेही रावळच लिहितात.
अभय नातू १६:३२, १८ डिसेंबर २००९ (UTC)
ता.क. गुजराती, गुजराथी नव्हे :-)
- हो. गुजराती आडनावांमध्ये रावळ (जुन्या काळी हेच आडनाव राऊळ असेही वापरात होते, असे दिसते. इ.स.च्या बाराव्या शतकात महाराष्ट्रात कर्य केलेले महानुभावी संत चांगदेव राऊळ हे मूळचे गुजरातातलेच.) असे आडनाव असते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या भाषेच्या मर्यादेत राहून रावल असे आडनाव वापरले जाते (जसे 'श्रेयस तळपदे' यांचे 'श्रेयस तलपडे' :) ).
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०१, १८ डिसेंबर २००९ (UTC)