चर्चा:नीलिमा मिश्रा
या पानावर पानकाढा साचा लावण्याचे कारण उल्लेखनीयता आहे का? लेखातील माहितीनुसार तसेच या दुव्यानुसार नीलिमा मिश्राला २०११चा मॅगसेसे पुरस्कार घोषित झाला आहे. इतके कारण उल्लेखनीयतेसाठी पुरेसे आहे. या कारणास्तव या लेखातील मजकूर पुनर्स्थापित करीत आहे.
अभय नातू १७:३२, २८ जुलै २०११ (UTC)
कारण उल्लेखनीयता?
संपादनमला बरेचदा विकीवरचे मराठी समजत नाही. "कारण उल्लेखनीयता " हे कोणत्या इंग्रजी वाक्प्रचाराचे भाषांतर आहे?
पुनर्स्थापित ऐकायला फार खडबडीत वाटतो, पुनःस्थापित म्हटले तर बरे होईल. ‘स’ हे कठोर व्यंजन आहे, त्याच्याअगोदर येणार्या विसर्गाचा ‘र’ होत नाही, अशी माझी समजूत आहे....J १७:५९, २८ जुलै २०११ (UTC).
कारण उल्लेखनीयता
संपादनकारण उल्लेखनीयता हे दोन वेगळे शब्द आहेत. माझे वाक्य होते - या पानावर पानकाढा साचा लावण्याचे कारण उल्लेखनीयता (हे) आहे का?
पुनःस्थापित या शब्दातील चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू १८:०४, २८ जुलै २०११ (UTC)