चर्चा:धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी

ही यादी कोठून घेतली आहे? हे दहशतवादी भारत सरकारच्या मते दहशतवादी आहेत? अमेरिकेच्या (एफ.बी.आय., इ.) कि इतर कोणी देश/संस्थेच्या मते?

नुसतीच नावे लिहिण्यापेक्षा या व्यक्तींचे लेख लिहून ते [[वर्ग:दहशतवादी]] या वर्गात समाविष्ट करावे.

अभय नातू ११:४०, ३ मे २०११ (UTC)


ज्ञानकोशीय मूल्य

संपादन

अगदी अगदी! अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि राम गोपाल वर्मा यांना "जे" यांनी दहशतवादी म्हणून घोषित केले, हे पाहून अचंबित झालो :).

"जे", आपली वैयक्तिक मते प्रचलित मतापेक्षा भिन्न असू शकतात, त्याबद्दल काही म्हणणे नाही; पण विकिपीडियावर ज्ञानकोशीय माहिती लिहिणे अपेक्षित आहे (अधिक माहितीसाठी वाचा: विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे). आपल्यासारख्या अनुभवी सदस्याकडून या पैलूबाबत दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:१६, ३ मे २०११ (UTC)

तूर्त यादी

संपादन

यादीत ज्यांची नावे आहेत, आणि जी अजून लिहावयाची आहेत त्यांतल्या प्रत्येकाबद्दल निदान अर्धे पान भरेल येवढी माहिती माझ्याकडे आहे. त्यांच्यावर लेख लिहिण्यापूर्वी तूर्त फक्त यादी करण्याचे काम सुरू केले आहे. जसजसा वेळ मिळेल मिळेल तसतसे लेख, मी किंवा आणखी कोणीही लिहू शकेल.

या यादीतल्या लोकांसाठी भारत सरकार किंवा कोणत्याही देशाच्या सरकारकडून शिफारसपत्र मिळवण्याची गरज नसावी. यादीतला प्रत्येक माणूस दहशतवादी आहे हे, ज्याला सारासाराविवेक बुद्धी आहे तो सहज मान्य करेल. आज दूरदर्शनवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांतून आणि आंतरजालावर अनेक विचारवंत आपली मते व्यक्त करताना ओसामाची तुलना हिटलरशी करत आहेत. दहशतवाद्याची व्याख्या करताना मी ’सबळ कारण नसताना नरसंहार कराणारा’ हा मुद्दा आधीच विचारात घेतला आहे. पन्नास लाख निरपराध ज्यूंची अकारण हत्या करणारा जर दहशतवादी नसेल तर आणखी काय असेल?

भारताचे आयसी १३४ (चू.भू.द्या.घ्या.) हे विमान पळवून लाहोरला नेणार्‍यांत राम गोपाल वर्मा ऊर्फ शाहीद अख्तर सैद हा होता. त्याने विमानातल्या रूपेन कत्याल या प्रवाशाची हत्या केली. तो दहशतवादी नाही?

जेव्हा मी लेख लिहीन तेव्हा त्यांत फक्त माझी वैयक्तिक मते नसतील, तर त्या लेखांत अनेक मान्यवर विचारवंतांच्या मतांचे प्रतिबिंब असेल....J १८:०४, ४ मे २०११ (UTC)

जे,
तुम्ही लेख लिहितो म्हणलेले वाचून आनंद झाला.
कोणत्याही व्यक्तीस दहशतवादी म्हणण्यापूर्वी शिफारसपत्र (!) मिळणे आवश्यकच आहे. १. जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखादी व्यक्ती दहशतवादी म्हणण्याच्या लायकीची असेल तर मग नक्कीच एकतरी देशाची अशेच मत असेल, बरोबर? मग तेथे तसे संदर्भ द्यावे इतकेच माझे म्हणणे आहे. २. दहशतवादी ठरण्यासाठी ’सबळ कारण नसताना नरसंहार कराणारा’ हे कारणच दुर्बळ आहे. हे वर्णन जक्कल, सुतार, इ. सारख्यांना लागू होईल किंवा रामन राघवन सारख्या खुन्याला. प्रत्येक दहशतवादी स्वतःला स्वातंत्र्यसैनिक, धर्मसैनिक, जातसैनिकच मानत असतो आणि बहुसंख्य "कुप्रसिद्ध" दहशतवाद्यांना असे समजणारे हजारो, लाखो लोक असतात. तरी हे कारण/criteria लागू होत नाही. ३. यातील बर्‍याच व्यक्तींनी कधी कोणाला व्यक्तिशः मारलेले नाही, पण मारायचे हुकुम दिले. मग जनरल माणेकशा, मॅकआर्थर, हॅरी ट्रुमन, इ.ना पण दहशतवादीच ठरवायचे?
एका देश, जात, प्रदेशाच्या दृष्टिकोनातून दहशतवादी असलेली व्यक्ती इतर ठिकाणी पूजनीय असू शकते, नव्हे बरेचदा असतेच. भगतसिंग - कागदोपत्री दहशतवादी (आत्ताआत्तापर्यंत), सुभाषचंद्र बोस, शे ग्वेव्हारा, फिदेल कास्त्रो, माओ अशी पृथ्वीगोलावर प्रत्येक ठिकाणाहून उदाहरणे देता येतील.
असो, माझा विरोध होता तो १. फक्त यादी करण्याला आणि २. संदर्भ नसताना एखाद्याला दहशतवादी लेबल देण्याला. अर्थात, या यादीतील बहुसंख्य व्यक्तींबद्दल आक्षेप येऊ नयेत (माझे व्यक्तिगत मत, अर्थात), पण आल्यास त्याला विरोध करणे मुश्किल होईल.
तुम्ही लिहिणार असलेल्या लेखांची उत्कंठेने प्रतीक्षा करीत आहे...टीका करण्यास नाही तर ते लिहिले जात असताना मदत करण्यास.
अभय नातू १८:३७, ४ मे २०११ (UTC)


अभय म्हणतो तोच मुद्दा मलाही महत्त्वाचा वाटतो. तुम्ही लावाल त्या देशाच्या/पक्षाच्या चष्म्यातून तुम्ही दहशतवादाची (आणि चाचेगिरी वगैरे मुद्द्यांची) व्याख्या मांडून जंत्री लावू शकता. असल्या पक्षपातीपणाच्या जंत्र्यांना मराठी विकिपीडियाने अजिबात स्थान देऊ नये ("जे" यांच्या जरब/दहशत बसवणार्‍या शैलीत सांगायचे, तर "जिवंत सोडू नये" :) ). :D
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३२, ५ मे २०११ (UTC)
"धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी" पानाकडे परत चला.