हिंदू धर्मातील विविध आचार यासंदर्भात विविध निबंधग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यामुळे याविषयी एकच एक प्रमाणग्रंथ असे म्हणणे अवघड आहे. त्या त्या परिस्थितीला अनुसरून आचारात बदल करावे लागतात.आर्या जोशी (चर्चा)


@आर्या जोशी:

विकिपीडियामध्ये प्रवेश सहज सोपा आहे. प्रवेशकरणाऱ्या सर्वांनाच विकिपीडिया ज्ञानकोश आहे आणि ज्ञानकोश हि संकल्पना माहित असतेच असे नाही. ज्ञानकोशाच्या परिघाच्या मर्यादांशी परिचय होण्यास वेळ लागतो.


वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.


सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..
इतरांसी जे ठावे, ते माहित करुन घ्यावे नीट पडताळूनी संदर्भ तयाचे; तटस्थ, वस्तुनिष्ठ, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी मांडावे ; ज्ञान वाटावे ज्ञानार्जनासाठी ज्ञानकोशी.
यात जे लेखन बसत नाही त्यास संपादकीय कात्री लावावी.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३८, १७ जानेवारी २०१७ (IST)Reply
@माहितगार:सदर माहिती धर्मसिंधु ग्रंथाच्या प्रस्तावनेतील भागातूनच नोंदविली आहे. त्यात व्यक्तीग्त मत समाविष्ट नाही.आर्या जोशी (चर्चा)
नमस्कार, समस्या मुख्यत्वे तुमच्या आधी या लेखात ज्यांनी भर घातली होती ( पहिला परिच्छेद) त्यांच्या लेखनात व्यक्तिगत मतांची रेलचेल वाटते. तुम्ही या चर्चेत "त्यामुळे याविषयी एकच एक प्रमाणग्रंथ असे म्हणणे अवघड आहे." हा जो मुद्दा उचलला आहे त्या अनुषंगाने संपादकीय कात्री मनमोकळे पणाने लावण्याचे आपणास सुचवत होतो.
शेवटचे वाक्य बहुधा आपण ग्रंथातील प्रस्तावनेच्या आधारे जोडल्याचे दिसते. पण बाहेरुन प्रथमच वाचणाऱ्या वाचकास ते विकिपीडिया संपादकाचे व्यक्तिगत मत असल्याचे वाटण्याचा संभव आहे. विकिपीडिया लेखाने कोणत्याही विशीष्ट मताची भलावण करणे अभिप्रेत नाही त्यामुळे वाक्य रचनेत मत कुणाचे आहे हे अधिक स्प्ष्ट नोंदवले जावयास हवे असे वाटते.
" ज्यावेळी समाजात धार्मिक आचार विषयक संभ्रम निर्माण होतो किंवा अन्य सामाजिक संस्कुतीचे मिश्रण झाल्याने आपण नकी काय करावे असा पेच निर्माण होतो तेंव्हा असे ग्रंथ मार्गदर्शनपर ठरतात " हे वाक्य " ग्रंथाचे कर्ते हे काशीनाथ शास्त्री उपाध्याय यांच्या मतानुसार, ज्यावेळी समाजात धार्मिक आचार विषयक संभ्रम निर्माण होतो किंवा अन्य सामाजिक संस्कुतीचे मिश्रण झाल्याने आपण नकी काय करावे असा पेच निर्माण होतो तेंव्हा असे ग्रंथ मार्गदर्शनपर ठरतात " असे थोडासा बदल करुन लिहिण्या बद्दल करावा असे सुचवावेसे वाटते.
आपल्या मागील काही लेखातील लेखनात " असे करावे" सदृश्य वाक्ये आहेत त्यांना आपल्या सवडीने "असे करतात" या वाक्य रचनेने बदलावे अशी विनंती आपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटींमध्ये करणार होतो पण वेळे अभावी आपणाशी चर्चा होऊ शकली नव्हती. तो बदल काळाच्या ओघात यतावकाश करुन घ्यावा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०७, १९ जानेवारी २०१७ (IST)Reply
"धर्मसिंधु" पानाकडे परत चला.