चर्चा:धम्म
सकारात्मक प्रतिसाद
संपादनधम्म हा लेख बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि जागतिक दृष्टिकोन ठेवून लिहिणे अपेक्षित आहे, कारण मराठी विकिपीडिया हा विश्वकोश आहे. महाराष्ट्राखेरीज आशियात अन्यत्र बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अखंडित परंपरा आहेत. थायलड, श्रीलंका, व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस इत्यादी देशांत थेरवादी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परंपरा अनेक वर्षे अनेक बौद्ध तत्त्वज्ञांनी जोपासल्या आहेत. चीन व जपान या देशांतही हीनयान व त्यांची स्वतःची अशी अस्सल बौद्ध तत्त्वपरंपरा आहे. त्या सर्वांमध्ये धम्म ही संकल्पना अतिशय आधारभूत मानली गेली आहे. त्यामुळे धम्म या लेखात केवळ आंबेडकरांच्या विचारांपुरता परिप्र्येक्ष मर्यादित ठेवून चालणार नाही. त्या दृष्टीने त्याचे जागतिक दृष्टिकोनातून पुनर्लेखन होणे अपेक्षित आहे.
शुद्धलेखनाच्या बाबत सर्व लेखांबाबत जे धोरण लागू होते, तेच याही लेखाबाबत लागू होते. या लेखावर शुद्धलेखनाच्या दृष्टीने काम करावयास हवे, म्हणून शुद्धलेखन/पुनर्लेखनाचा संदेश लावला आहे.
संदर्भांबद्दल : विश्वकोशीय लेखांमध्ये जेव्हा काही महत्त्वपूर्ण विधाने लिहिली जातात, तेव्हा त्यांच्या पुष्ट्यर्थ संदर्भ लिहिणे आवश्यक असते. म्हणून संदर्भ हवा हा साचा लावला आहे.
या सर्व बाबी, धम्म हा लेख अधिकाधिक वाचनीय बनवण्याच्या दृष्टीने खरे तर सकारात्मक मानायला हव्यात. परंतु आपण जातीयवादाच्या गैरसमजातून या गोष्टीँचे गैरार्थ काढत आहात, असे आपल्या चावडीवरील संदेशावरून वाटते. वस्तुतः मी कुठल्या कुळात जन्माला आलो किंवा मी कुठला धर्म मानतो, ही माझी व्यक्तिगत बाब आहे. त्याची मी विकिपीडियावरील किंवा अन्य कोणत्याही सामाजिक पैलूंमध्ये गल्लत करत नाही. माझे येथील योगदान हिंदू, बौद्ध, इस्लाम, शीख, ख्रिश्चन अश्या अनेक धर्ममतांविषयीच्या लेखांवर याआधीच झाले आहे. त्यामुळे माझा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आहे, हे सांगण्याची मला निराळी आवश्यकता वाटत नाही. असो. हे माझे या व्यक्तिगत बाबीविषयीचे अखेरचे मतप्रदर्शन. धम्म या लेखात अधिकाधिक भर घालण्याविषयी व काही पैलू अधिक वाचनीय घडवण्यासाठी चर्चा करायची असल्यास, स्वागतच आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५५, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)