चर्चा:डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो

"ङ"

अफ़्रिकन भाषांमध्ये अनेकदा ङ किवा ञ ही पूर्णाक्षरे असलेले शब्द आढळतात. उदाहरणार्थ, स्वतंत्र घानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष- क्वामे ङकृमा (Kwame Nkrumah). म्हणजे ङ आणि कृ ही दोनही रोमन लिपीत सहजासहजी न लिहिता येण्यासारखी अक्षरे. आपले भारतीय दार्जीलिंग हे नाव खुद्द त्या शहरात ठिकठिकाणी दुकाने किंवा संस्थांच्या पाट्यांवर दार्जीलिंङ(पाय न मोडलेला ङ) असे रंगवलेले दिसते. इंग्रजीत -ing किंवा -ink चा उच्चार -इङ्‌ असा होतो. शब्दकोशात तो अनेकदा -iŋg या चिन्हाने दाखवतात. तुमचा हा डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो सुद्धा ङ्‌वेसो असावा. माझे म्हणणे योग्य असल्याचा पडताळा घेऊन जरूर ती सुधारणा करावी. 'शोध'साठी दोन्ही पर्याय लागतील. --J-J १०:०२, ९ मे २००७ (UTC)

तुमचा हा डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो सुद्धा ङ्‌वेसो असावा
तुमचा?
अभय नातू १०:३३, ९ मे २००७ (UTC)

तुमचा म्हणजे ज्यांनी ही डेनिस सासू मराठी विकिपीडियावर आणली त्यांचा. मी तरी हे नाव यापूर्वी कधीही वाचलेले नव्हते. या नावाला विकिपानावर एवढे उच्च स्थान मिळाले म्हणून माझे लक्ष गेले.--J--J ०५:१०, १० मे २००७ (UTC)

तुमचा म्हणजे ज्यांनी ही डेनिस सासू मराठी विकिपीडियावर आणली त्यांचा.
आपले हे लिहीणे हा गमतीचा भाग असेल अशी आशा आहे. येथे कोणीही कोणाचा नाही.
मी तरी हे नाव यापूर्वी कधीही वाचलेले नव्हते. या नावाला विकिपानावर एवढे उच्च स्थान मिळाले म्हणून माझे लक्ष गेले.
अशा अनेक गमतीजमती येथे दडलेल्या आहेत. विकिपीडिया सहज 'चाळला' असताही वाचकाचा ज्ञानात कुत्सित शंकासमाधानास्तव अथवा जिज्ञासापूर्तीस्तव का होईना पण भरच पडते याचे हे उदाहरण आहे.
अभय नातू ०७:१७, १० मे २००७ (UTC)

डेनिस सासू हमरा की तुमरा हा मुख्य मुद्दा नाही आहे. प्रश्न असा आहे की हे नाव मराठीत कसे लिहावयाचे? मूळ इंग्रजी स्पेलिंगात ng असेल तर मराठीत 'ङ' होऊ शकते. ss चे श किंवा स; स्स करायलाच पाहिजे असे नाही. इंग्रजी 's' चा उच्चार 'ज़ वा झ' न होता स किंवा श व्हावा म्हणून ss येते. उदा. As(ज़) आणि Ass(स). Assume(s) आणि Assure(श), पण resume(झ). s हे अक्षर फ़,ट,क,थ,किंवा प च्या पुढेमागे आले तर नेहमीच 'स' असते. (Remember फुटका-थुटका कप. किवा फुकट थाप) अन्यथा ज़/झ. (क्रीस-ग्रीस-पीस सारखे थोडे अपवाद आहेत.) तेव्हा 'कोणाच्याही' नसलेल्या या सास्सून्ग्वेसोचे नाव मराठीत कसे लिहायचे? माझ्या मते सासूङ्‌वेसो. अर्थात हा माझा निव्वळ अंदाज आहे. अगोदरच लिहिल्याप्रमाणे हे नाव मी यापूर्वी लिहिलेले-वाचलेले-ऐकलेले-उच्चारलेले नाही.--J-J १९:३२, १० मे २००७ (UTC)

Start a discussion about डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो

Start a discussion
"डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो" पानाकडे परत चला.