चर्चा:टोपणनावानुसार मराठी लेखक
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by ज in topic बी टोपणनाव कोणकोणते साहित्यिक वापरत ?
बी टोपणनाव कोणकोणते साहित्यिक वापरत ?
संपादनया लेखात बाळकृष्ण अनंत भिडे यांच्यासाठी बी हे टोपणनाव दिले आहे-त्या बद्दल दुजोरा हवा आहे. कवि नारायण मुरलीधर गुप्ते हे सुद्धा बी हे टोपणनाव वापरत असे दिसते.
बाळकृष्ण अनंत भिडे नावाचे मराठीत किती साहित्यिक आहेत ? याची सुद्धा माहिती हवी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४१, १३ डिसेंबर २०१५ (IST)
बाळकृष्ण अनंत भिडे हे गद्य लेखनासाठी आपल्या नावाचे ‘बी‘ हे आध्याक्षर टोपणनाव म्हणून वापरत. कवी नारायण मुरलीधर गुप्ते हे भ्रमर अशा अर्थाने ‘बी` (Bee) नाव वापरत.
जे एक प्रसिद्ध बाळकृष्ण अनंत भिडे आहेत, त्यांच्यावर पान तयार केले आहे. बाळकृष्ण अनंत भिडे नावाचे इतर कोणी साहित्यिक असल्यास ते इतके प्रसिद्ध नसावेत. ... ज (चर्चा) १८:५२, १३ डिसेंबर २०१५ (IST)