जेजुरी या पानाचा शोध घेतला असता जेजुरी धार्मिक क्षेत्र हे पान न उघडता (इंग्रजी विकीमध्ये सोय आहे त्या प्रमाणे)जेजुरी निःसंदग्धीकरण हे पान उघडायला हवे असे वाटते. सर्व निःसंदग्धीकरण पानांवर हा बदल करण्यात यावा. सौरभदा ०५:२८, २५ सप्टेंबर २००८ (UTC)

निःसंदिग्धीकरणाबाबत असे साधारण नियम आहेत --
  • जर एकाच शब्दाचे/शब्दसमूहाचे अनेक अर्थ/उपयोग असतील तर निःसंदिग्धीकरण पान तयार करावे.
  • त्या शब्दाच्या प्रत्येक पानावरुन निःसंदिग्धीकरण पानाकडे {{हा लेख}} हा साचा वापरून दुवा द्यावा.
  • जर त्या शब्दाचा एखादा अर्थ रूढ असेल (उदा - जेजुरी) तर मुख्य पानावर त्याबद्दलचा लेख तयार करावा, इतरांसाठी वरचे नियम.
  • जर दोन (किंवा अधिक) अर्थ (जवळपास) equally रूढ असतील तर मुख्य पानाचे निःसंदिग्धीकरण पानाकडे पुनर्निर्देशन करावे - उदा - व्यास, वारणा
  • हे नियम करण्यामागे वाचकाला कमीत कमी टिचक्यांत इच्छित माहिती (बहुतांश वेळी) मिळावी हा हेतू आहे.
अभय नातू ०५:५५, २५ सप्टेंबर २००८ (UTC)

नाम जेजुरगड सुंदर जेथे नांदतो म्हाळसावर संगे भैरव अपार पूर्ण अवतार शिवाचा ll

नील अश्वावरी स्वार हाती घेउनी तलवार करुनी मणीमल्ल संहार करी उद्धार जगाचा ll

चंपाषष्ठीचा उत्सव भोर यात्रा भरती अपार येळकोट नामाचा गाजर भक्त आनंदे करतिया ll

दास म्हणेजी रामराव राम तोचि खंडेराव जेथे भाव तेथे देव लक्ष पाहि झटालीया ll

उपाध्ये गुरूजी. जेजुरी.

खंडोबाची स्थाने संपादन

सागरने खंडोबाची स्थाने हा विभाग स्वरूपात जोडला आहे,मला वाटते खंडोबाची स्थाने असा लेखाच्या शेवटी लावण्याचा मार्गक्रमण साचा बनवण्यात कुणी पुढाकार घेतल्यास त्यास्वरूपात त्या सर्व गावांच्या आणि खंडोबा लेखात तो साचा लावता येईल आणि लेखांना चांगले रूप येण्यातही मदत होईल माहितगार १२:२२, १३ ऑगस्ट २०११ (UTC)
"जेजुरी" पानाकडे परत चला.