इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.


एलिफंटा लेणी घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.

मुंबई दर्शनमधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ.. असं असलं तरी मुंबईत नाही तर मुंबईपासून दहा कि.मी. अंतरावर समुद्रात हे स्थळ आहे. गेट वे ऑफ इंडियावरून दुरूनच नजर टाकली की समुद्राच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण अंधुक किंवा धूसर का होईना पण नजरेत भरतं. असं हे ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून घारापुरी किंवा एलिफंटा केव्हज हे होय.

 
लेणी -गुहा क्रमांक १

कसे जावे ? एलिफंटा केव्हज्ना मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरूनच जाता येतं. गेट वे ऑफ इंडियावरून सकाळी ९ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच बोटी उपलब्ध आहेत. एलिफंटावरून परतण्यासाठी संध्याकाळी शेवटची बोट ५ वाजता आहे.एलिफन्टा कॅव्हेस जाण्यासाठी फेरी होड्या उपलब्ध केल्या गेल्या आहेत.शिवाजी महाराज टर्मिनस ,मुंबई स्टेशन पासून गेट वे ऑफ इंडिया व तिथून बेटावरती जाण्यासाठी जात येते .पाण्यावरील १३ किलोमीटर एवढं अंतर फेरीने पार करताना समुद्र जीवनाचा अतिशय छान प्रत्यय येतो.तिथून पुढे किनाऱ्यापासून गुहेपर्यंत जाण्यासाठी टॉय ट्रेनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे.

 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे

पोहोचल्यावर दोन रस्ते दिसतात. एक गुंफाकडे जाणारा आणि दुसरा हिलवर जाणारा. गुंफेकडे जाणा-या रस्त्याने आत गेलं की आपल्याला प्रवेश शुल्क भरावं लागतं. पंधरा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे तर मोठय़ा माणसांसाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येतं. सोमवारी मात्र या गुंफा बंद असतात. थोडं पुढे गेलं की पहिलीच गुंफा दिसते. एलिफंटा लेणी समूहात एकूण ७ शैलकृत लेणी आहेत. त्यापैकी ५ शैलकृत लेणी पश्चिम टेकडीवर आहेत तर उरलेल्या दोन या पूर्वेकडील टेकडीवर आहेत.

 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे
 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे

गुहेची संरचना पहिल्या क्रमांकाच्या मुख्य गुंफेत प्रवेश केल्यावर गुंफेच्या मध्यभागी असलेली महेश प्रतिमेची लेणी आपल्याला आकर्षित करते. हे शिल्प सर्व शिल्पांचा आत्मा ठरते. याची खोली ३.२ मीटर आणि रुंदी ६.५५ मीटर तर उंची ८.३ मीटर आहे. भिंतीच्या स्तंभामध्ये द्वारपालांच्या तीन भव्य मूर्ती आहेत मात्र त्या सुस्थितीत नाहीत. मुख्य महेश शिल्प म्हणजे भारतीय शिल्पकलेचा परमोच्च बिंदू समजला जातो. या कलाकृतीत सर्वत्र जटा मुकुटच आहे. डावीकडे अघोर (रुद्र) रूप आहे. त्याच्या मुकुटात साप, विंचू आणि मेलेल्या माणासाचे शिर आहे. हातात फुत्काराने फणा उभारलेला नाग, तिसरा डोळा आणि पिळदार मिशा पाहून चेह-यावरचा रुद्र भाव लक्षात येतो. म्हणूनच या मूर्तीला ‘अघोर’ किंवा ‘भैरव’ असं म्हणतात. मधला चेहरा शांत निरामय आहे. त्याला ‘तत्पुरुष महादेव’ असं म्हणतात. उजवीकडील चेहरा कोमल आणि प्रसन्न आहे. केशअलंकार आणि हातात बांगडय़ा आणि कर्णकुंडलं आहेत. यालाच ‘वामदेव’ किंवा ‘उमा’ असं समजलं जातं. या महेशमूर्तीच्या एका बाजूला गंगाधारण केलेली गंगाधरशिवाची मूर्ती असून दुस-या बाजूला शिव अर्धनारी नटेश्वराचे शिल्प आहे. गंगाधर शिल्पाच्या वरच्या बाजूला अप्सरा, गंधर्व आणि ष्टद्धr(7०)षिमुनी यांचीदेखील चितारलेली शिल्प आहेत.

 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे

मुख्य शिल्पाच्या दोन्ही बाजूला पूर्व अणि पश्चिमेला द्वारमंडप आहेत. तिथे जायला दोन प्रवेशद्वार आहेत. पश्चिम द्वारमंडपाच्या बाजूला मंदिराच्या गाभा-यात शिवलिंगाची स्थापना असून त्यांच्या भिंतीवर द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. आजूबाजूला शिव-पार्वती विवाह, अंधकासुर वध मूर्ती, महायोगी शिवा, रावण कैलास पर्वत हलवताना, शिव-पार्वती चौरस खेळताना, नटराज शिव अशी विविध शिल्प पाहायला मिळतात. या सगळ्या भव्य शिल्पाकृती पाहून आपण अक्षरश: स्तब्ध होतो.

 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे

मुख्य शिल्पापासून काहीशा अंतरावर गेल्यावर दुस-या क्रमांकाची गुंफा दिसते. तिथेही आजूबाजूला दगडात कोरलेली आणि काहीशी दुरवस्था झालेली काही शिल्प आणि शिवलिंग दिसतात. तिस-या क्रमांकाची गुंफा काहीशी मोठी असून मध्यभागी भव्य असं शिवलिंग पाहायला मिळतं. बाजूला असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गुंफेत मध्यभागी शिवलिंग आहे तर बाजूला दोन अंधा-या खोल्याही आहेत. मात्र त्या खोल्यांमध्ये काहीच नाही. बाजूची पाचवी गुंफा जरा खोल आहे. या शैलकृत लेण्या मुख्य लेणीच्या तुलनेत सामान्य किंवा कमी अलंकृत आहेत. शेवटच्या पाचव्या गुंफेपाशी पोहोचतो तेव्हा तिथे खालच्या बाजूला मोठा तलाव दिसतो. तर समोरच्या डोंगरावर दोन लेण्या असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांकडून समजते. या बौद्ध लेण्या असून तिथे एक विशाल स्तूप, इ.स चौथ्या शतकातील काही नाणी यांच्या प्रतिमा आहेत. मात्र या लेण्या पडझडीला आल्यामुळे तिथे प्रवेश निषिद्ध आहे. या ठिकाणच्या प्रत्येक गुंफांमध्ये जी काही शिल्प कोरलेली आहेत त्यांच्यात एक कथा दडलेली आहे. ती कथा जाणून घेण्यासाठी तुम्हाला एका मार्गदर्शक (गाईड) सोबत घेणं आवश्यक आहे. याशिवाय बाहेर असलेल्या अनेक स्टॉल्सपैकी एलिफंटाची माहिती सांगणारी पुस्तिकादेखील मिळते. ती घेतली तरी तुम्हाला या लेण्या समजायला सोपं होईल. लेण्या पाहून आपण पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. तिथे एक रिसॉर्ट आहे. तिथून पुढे वर कॅनॉन हिलकडे जाण्यासाठी पाय-या दिसतात. या पाय-या चढायला कठीण आहेत. मात्र वर गेल्यावर दोन ब्रिटिशकालीन तोफा पाहायला मिळतात. तिथून घारापुरीचा संपूर्ण परिसर दिसतो. इतकंच नाही घारापुरीच्या पायथ्याशी असलेली राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदरही दिसतात. तसंच आणखी दूरवर नजर टाकलीत तर मुंबई, नाव्हा शेवा बंदर आणि अथांग पसरलेल्या सागराचं मनोहारी दृश्य दिसतं.

 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे
 
एलिफन्टा कॅव्हेस छायाचित्रे

इतिहास घारापुरीत असलेली राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदर पाहून घारापुरी हे प्राचीन काळी बंदर असल्याची जाणीव होते. ही बंदरं फार जुन्या काळातली असल्याची माहिती मिळते. आजही या बंदरांवर १६०० लोकांची वस्ती आहे. पर्यटन, शेती आणि मासेमारी हे तिथल्या लोकांचे प्रमुख व्यावसाय आहेत. या परिसराला घारापुरी हे नाव कसं पडलं याची माहिती तिथल्या स्थानिकांकडून मिळते. घारा म्हणजे गुरव आणि पुरी म्हणजे नगर. शिवमंदिरातील पूजा करणा-या पूजा-यांना पूर्वी गुरव या नावाने संबोधलं जायचं. अशा गुरव पूजा-यांची वस्ती असलेलं नगर म्हणून त्याला ‘घारापुरी’ असं नाव पडलं. इथल्या लेण्यांत शैव परंपरेतील शिल्पाकृती असल्याने गुरवांची वस्ती असणं शक्य आहे. दुसरं म्हणजे ‘घारा’ हा शब्द किल्ल्यासाठी किंवा बुलंदी तटबंदीसाठी वापरला जातो. किल्ल्यासारख्या तटबंदीची नगररचना असलेलं नगर म्हणूनही या ठिकाणाला ‘घारापुरी’ असं नाव पडलं असावं असा अंदाज बांधता येतो. मूळचं घारापुरी असलेलं हे बेट ‘एलिफंटा’ या नावानेही ओळखलं जातं. या बेटाचं एलिफंटा असं नामकरण पोर्तुगीजांनी केलं. त्यामागे एक कथा आहे. इ. स. १५३४च्या सुमारास व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला उतरले. तिथे फिरताना त्यांनी या लेण्यांच्या परिसरात एका हत्तीचं पाषाण शिल्प पाहिलं. त्या शिल्पाला पाहून ते ‘एलिफंटा’ असे संबोधलं, तेव्हापासून पोर्तुगीज या बेटाला ‘एलिफंटा’ असंच नाव पडलं. आणि इथल्या लेण्यांचा उल्लेख ‘एलिफंटा केव्हज’ असा करण्यात आला. ब्रिटिश राजवटीत या लेण्या एलिफंटा केव्हज या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आता हे हत्तीचं शिल्प या ठिकाणी नाही. हे शिल्प हल्ली मुंबईच्या जिजामाता उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

कॅनन हिल आणि बाजार एलिफन्टा कॅव्हेस सोबतच ह्या बेटावर अनेक आकर्षक स्थळे पाहण्यासारखी आहेत.कॅव्हेस कडे जाताना दोन रस्ते दिसून येतात.त्यामधील एक रस्ता हा कॅव्हेस कडे तर दुसरा मार्ग हा कॅनन हिल कडे जातो.१२-२० मिनिटांच्या रोमांचक आणि जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने हिलच्या टोकावर पोहोचता येते.तेथे अजूनही पोर्तुगीज कालीन तोफ चांगल्या परिस्तिथीथीमध्ये दिसून येते.हिलच्या टोकावरून समुद्री दुनियेचा आस्वाद घेऊ शकतो.


संतोष गोरे ( 💬 ) १४:२८, १६ जुलै २०२१ (IST)Reply

"घारापुरी लेणी" पानाकडे परत चला.