संन्यास: कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥ ... गीता ५.२

श्लोकाचा अर्थ : कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही कल्याण करणारेच आहेत.परंतु त्या दोहोंतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

अवघड शब्द :- मोक्ष या शब्दाकरिता संस्कृतमध्ये अनेक पर्यायी शब्द आहेत. अपवर्ग, अमृत, कैवल्य, निर्वाण, नि:श्रेयस, मुक्ति, मोक्ष , श्रेय वगैरे. त्यामुळे, निःश्रेयसकरौ=मोक्षदायक; उभौ=दोन्ही; तयोस्तु=त्या दोघांत; विशिष्यते=अधिक चांगला. ---..J (चर्चा) २३:२३, ८ जून २०१२ (IST)Reply


धन्यवाद J. मूळ लेखातून हा श्लोक काढावा असे वाटते. विशेषतः अर्थभेद या विभागातून. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०९:१०, ९ जून २०१२ (IST)Reply

श्लोक काढायला काहीच हरकत नाही,तसा तुम्ही काढलाच आहे. आता ज्ञानेश्वर या श्लोकाबद्दल काय म्हणतात ते पाहू. : -

ज्ञानेश्वरी योगगर्भयोग (अध्याय पाचवा) :-

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकर तत्त्वता । दोनीहि होती ॥ १५ ॥

तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥ १६ ॥

तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥ १७ ॥

आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचे चिन्ह । मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं ॥ १८ ॥

हे कुंतीसुत अर्जुना, हे संन्यास(कर्मत्याग) आणि कर्मयोग(कर्माचे अधिष्ठान), विचार करून पाहिले तर, दोन्ही तात्त्विकदृष्ट्या मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ..१५

तरीपण जाणते व नेणते, या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्यास खरोखर(कीर) सोपा(प्रांजळ) आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्यास, स्त्रियांना आणि बालकांना नाव (हे सोपे साधन आहे), त्याप्रमाणे (भवसागरातून तरून जाण्य़ाला) (कर्मयोग हे साधन आहे.)....१६

त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर, हाच सोपा (मार्ग) दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून(त्यागापासून) मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. ...१७

आता येवढ्याकरिता मी तुला कर्मसंन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत, असे तू सहजच जाणशील....१८

....J (चर्चा) १८:२२, ९ जून २०१२ (IST)Reply

"गोसावी समाज" पानाकडे परत चला.