गिरगाव

गिरगाव हे दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या पायथ्याशी वसलेले शहर आहे. समुद्रकिनारा,राजमार्ग,गगनचुंबी इमारती मुळे गिरगाव हे आकर्षक शहर बनले. शिक्षण,मनोरंजन,दळण-वळण,औद्योगिकीकरणाचा विकासातून गिरगाव या शहरास महत्व प्राप्त झालेच.तसेच दक्षिण मुंबईत हे शहर वसले असल्याकारणामुळे या शहराची किमंत वाढली व या शहरास महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.या नगराची रचना,घरे,रस्ते,सांडपाण्याची व्यवस्था,बाजारपेठ ई.शहराच्या विकासाची साक्ष देणारे आहे.या शहरातील लोक मुख्यतः उदरनिर्वाहासाठी उद्योग,व्यवसाय,खाजगी क्षेत्र,सार्वजनिक क्षेत्रावर अवलंबून आहेत.शहरातील गायवाडी येथे लोकांनी उभारलेले हस्त उद्योग तसेच कारखाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या शहराचा मुख्य विकास हा इतर गावातून तसेच पूर्वी जे आजूबाजूचे गाव होते तेथील लोकांचा स्थलांतरातून झालेला दिसून येतो.गिरगाव शहरात विविध सुखसोयी आहे व्यवसाय,व्यापार,शिक्षण,मनोरंजन,शासकीय व्यवहार केंद्रित झालेले आहेत.यातून काम करण्यासाठी स्थलांतराचे मोठे प्रमाण या शहरात आढळून येते.गिरगाव शहरात वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनामुळे औद्योगिक क्षेत्र आणि उद्योजक गिरगाव शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहे. शहराची प्रशासन व्यवस्था महानगरपालिकेद्वारे चालवली जाते.गिरगावात दळण-वळणाच्या साधनात वाढ झाल्यामुळे बाहेरील भागातूनही वाहतूक वाढलेली दिसून येते.तसेच शहरातील अंतर्गक वाहतूक ही बरीच गुंतागुंतीची आहे.या सर्वांवर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने,वाहतूक सुरळीत पणे चालण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु अजून असे नियोजन आढळून येत नाही.गिरगावातील लोकांचा विचार केल्यास मानवाला जीवनव्यतीत करण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा,हवापाणी आणि आरोग्यविषयक सुविधा इ.गोष्टीचे मोठ्या प्रमाणात वितरण झालेले दिसून येते.गिरगाव या शहरात १७७५ मध्ये रुस्तम पटेल यांनी सी.पी. टेंक येथे पाण्याचा हौद बनवला होता.त्यावेळेस येथूनच शहरास पाणीपुरवठा होत होता तसेच शहरात गायवाडी,अमरवाडी,फडकेवाडी,काकडवाडी येथे अनेक लहान मोठ्या विहिरी दिसून येतात.स्थानिक लोक आज हि या विहिरीतील पाणी वापरतात.सध्या शहरात मुख्यतः पाण्याचे वितरण महानगरपालिकेद्वारे केले जाते.गिरगाव शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार,नाझ,मोती,एडवर्ड,सुपर तसेच मराठी नाट्यमंदिर इ. आवश्यक सांस्कृतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने मोठी समस्या अशी दिसून येते कि शहरात वृक्षरोपण फारच कमी झाले आहे.तसेच ठाकुरद्वार,हेमराज वाडी,परशुराम वाडी येथे कचर्याचे मोठ-मोठे ढीग दिसून येतात.अशातून शहरात अस्वच्छ वातावरण निर्माण होते.गिरगावात प्रत्येक जाती धर्माचे लोक आढळून येतात.यात मोठ्या प्रमाणात जैन धर्मियाचा समावेश आहे.या प्रत्येक धर्मीयांची संस्कृती तेथे आपणास राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक इ.बाबतीत विविधतेत एकता दिसून येते.बाबा महाराज सातारकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश चतुर्थी दिवशी भव्य रेली निघते त्यावेळेस सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात.गिरगावातील लोक आजही पाचात्य संस्कृतीचा स्वीकार करत नाही.गिरगावच्या सुवर्ण इतिहासात सर्वात जुना मार्ग खाडिलकर रोड,तात्या घारपुरे रोड तसेच नवाकाळ बिल्डींग,शांताराम वाडी,उरणकर वाडी,कोची वाडी तसेच रामचंद्र आत्माराम आचार्य यांनी स्थापन केलेले १६१ वर्षपूर्ण जुने असे श्री.लक्ष्मी नारायण मंदिर इ. समाविष्ट आहे.


                                                                   रूपेश इंगळे
"गिरगाव" पानाकडे परत चला.