चर्चा:गांधी नावाच्या संस्थांची यादी
आता नरेंद्र मोदी, ललित मोदी व इतर मोदी बद्दल एकच लेख किंवा पुण्यातील चौंकाना मराठ्यांची, ब्राम्हणांची, मारवाड्यांची नावे असे लेख तयार करण्यास काही हरकत नसावी. माझ्या मते एक धर्म, जात , गोत्र इ. अनुषंगाने एक लेख लिहिला असता अनेक दुय्यम दर्जांच्या साप्ताहिकात , मासिकात लेखकाला प्रचंड यश मिळेल.
दिवाळी अंक व साप्ताहिकातील ललित लेखन प्रकारात मोडणारे अनेक लेख , सद्ंर्भ विरहीत माहीतींचा भरणा असलेले अनेक लेख इथे आहेत.
- शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या
- उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला
- ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता
- अनंत काणेकरांच्या पुस्तकाने प्रवासवर्णन ललित अंगाने कसे लिहिता येते ते मराठीच्या वाचकांना कळाले
- आणि तीही भरपूर पुस्तके लिहिणाऱ्या शैला कामत या सर्व लेखकांत अनोख्या आहेत
असे दिलखेचक वाक्य पाहिल्यास हि वाक्य सरळ एखाद्या दिवाळी अंकातुन आली किंवा दिवाळी अंकात जाण्यास तयार वाटतात. --विकिकरण (चर्चा) २१:१४, १ ऑगस्ट २०१३ (IST)
==उत्तर==.. >> शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता<<
कोठेही लिहिताना कोणत्याही व्यक्तीचा अधिक्षेप होऊ नये याबाबतीत जागरूक रहावे लागते. लता मंगेशकरांच्या बाबतीत मराठीत लिहिताना ’लता गायली’ किंवा ’लता गायल्या’ असे लिहिता येत नाही. असे लिहिणे व्याकरणदृष्ट्या अनुचित आहेच, आणि मराठी संस्कृती विचारात घेतली तर अक्ष्यम्य आहे. लताजी किंवा मा.लता किंवा लतादीदी असले शब्दप्रयोग अ-मराठी असल्याने वापरणे शक्य नाही. त्यामुळे लता मंगेशकर गायल्या किंवा लताबाई गायल्या असे लिहिणे भाग आहे. विकिपीडियावरच नव्हे तर जगातल्या कुठल्याही माध्यमात लिहिताना किंवा बोलताना कोणत्याही व्यक्तीचा अपमान होता कामा नये, हे आमची भारतीय संस्कृती सांगते.
त्यामुळे शैला लोहियांचा उल्लेख करताना ’शैलाबाई’ म्हणणे हे रीतीला धरून आहे. आता शैला लोहियांचे बालपण, शिक्षण, लग्न कसे झाले हे लिहिल्याखेरीज त्यांच्याबद्दलची माहिती पूर्ण होऊच शकत नाही. शिवाजीच्या पानावर जिजाबाईचे आणि औरंगजेबाचे नाव नसेल तर ती त्रुटी समजली जाईल. त्यामुळे शैला लोहिया यांच्या जीवनावर कुणाकुणाचा प्रभाव होता हे लिहिणे भाग आहे.
>>अनंत काणेकरांच्या पुस्तकाने प्रवासवर्णन ललित अंगाने कसे लिहिता येते ते मराठीच्या वाचकांना कळाले<< विकिपीडियावर जर मराठी भाषेत लिहिल्या गेलेल्या प्रवासवर्णनाचा इतिहास लिहायचे म्हटले तर उपरोक्त वाक्यातला मथितार्थ टाळता येणार नाही. अनंत काणेकरांनी लिहिलेले प्रवासवर्णन हे मराठीतले पहिले ललित प्रवासवर्णन आहे. त्यांनंतर अनेकजण त्या अंगाने लिहू लागले, पण सुरुवात काणेकरांनीच केली.
मराठी वाङ्मयाविषयी लिहिताना, विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरी नारायण आपटे, ना.सी. फडके आणि आचार्य अत्रे हे टप्पे घेतले नाहीत, तर इतिहासच लिहिता येणार नाही. या मंडळींपैकी प्रत्येकाने मराठीत एका नव्या युगाचा आरंभ केला. तसेच प्रवासवर्णनाच्या बाबतीत अनंत काणेकर युगप्रवर्तक आहेत. त्यांचा उल्लेख होणारच.
>आणि तरीही भरपूर पुस्तके लिहिणाऱ्या शैला कामत या सर्व लेखकांत अनोख्या आहेत << ही गोष्ट सत्य नाही? प्रवासवर्णनावर इतक्या संख्येत पुस्तके लिहिणे अनोखे नाही?....
मराठीत श्री.व्यं केतकरांचा ज्ञानकोश किंवा लक्ष्मणशास्त्री जोशांचा विश्वकोश डोळ्याखालून घातला तर अशा धर्तीची काही वाक्ये जरूर सापडावीत...J (चर्चा) ००:२८, २ ऑगस्ट २०१३ (IST)
मराठीत श्री.व्यं केतकरांचा ज्ञानकोश किंवा लक्ष्मणशास्त्री जोशांचा विश्वकोश डोळ्याखालून घातला तर अशा धर्तीची काही वाक्ये जरूर सापडावीत .- असे आहे म्हणुन त्यांची पध्द्ती विकि साठी प्रमान पध्दत आहे असे मानन्यात काही तथ्य नाही.
- संदर्भ रहित लेखन किंवा स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे
- शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले
वाक्य माहिती ज्ञानकोशात असावी हे मानन्यासाठी मी तयार नाही.
शैलाबाई उल्लेखा बाबत माझा प्रश्न नव्हता, मी पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे सादर करतो,
- शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या
- कश्यावरून , कोणी सांगितले
- उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन रा...............................वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला
- कश्यावरून , कोणी सांगितले
- ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता
- कश्यावरून , कोणी सांगितले, केंव्हा सांगितले.
- अनंत काणेकरांच्या पुस्तकाने प्रवासवर्णन ललित अंगाने कसे लिहिता येते ते मराठीच्या वाचकांना कळाले
- कश्यावरून , कोणी सांगितले
- आणि तीही भरपूर पुस्तके लिहिणाऱ्या शैला कामत या सर्व लेखकांत अनोख्या आहेत
- कश्यावरून , कोणी सांगितले
थोडक्यात खूप खस्ता खाल्या ह्या वाक्या एवेजी मी च्ंगळ केली असे लिहिलेतर तुमचा विरोधा तुम्ही कोणत्या मुद्यावर करणार.
--विकिकरण (चर्चा) ०२:४६, २ ऑगस्ट २०१३ (IST)
केतकरांचा ज्ञानकोश होता, तर्कतीर्थांचाही विश्वकोश नावाचा ज्ञानकोश आहे, आणि विकीही ज्ञानकोश आहे. जी पद्धती एका ज्ञानकोशावर प्रमाण आहे ती जगातल्या सर्व ज्ञानकोशावर निर्विवादपणे प्रमाण !
" मी 'च्ंगळ केली" चालणार नाही. कारण विकीच्या लेखपानावर मी-आम्ही-तू-तुम्ही-आपण हे शब्द निषिद्ध आहेत. वरील मजकुरात जितके ’कश्यावरून’ मागितले आहेत त्यांचा शोध घेणे कुणालाही शक्य आहे. शोधून नाहीच सापडले तर कळवावे.....J (चर्चा) २३:५०, २ ऑगस्ट २०१३ (IST)
तुम्ही पुन्हा माझे वाक्य चुकीच्या पध्दतीने वाचले, मी वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करतो.
- खूप खस्ता खाल्या = च्ंगळ केली असे लिहिले तर
- वाक्यातला मी म्हणजे लिहिणारा मी.
थोडक्यात तुम्ही लिहिले - खूप खस्ता खाल्या , कारण तुमच्या कडे असलेली माहिती व तुम्ही दिलेला व्यक्तिगत दुजोरा.
आता समजा मी लिहिले - च्ंगळ केली, कारण माझे मत.
कदाचीत वरिल माहिती आधारे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.
--विकिकरण (चर्चा) ००:१८, ३ ऑगस्ट २०१३ (IST)
ही पाने उघडून वाचावीत
संपादन[१] [२] ....J (चर्चा) ००:३६, ३ ऑगस्ट २०१३ (IST)
धन्यवाद ... तुम्ही दिलेली यादी पाहिली , मी देखिल तुम्हाला अनेक पाने ( वेगवेगल्या धर्म, जाती, पोटजाती ई. विरोधातील किंवा समर्थनातील) वाचण्यासाठी देउ शकतो. परंतु तो माझा येथिल चर्चेचा मुद्दा नाही.
मी अतिषय वेगळे प्रश्न मांडले आहेत, कदाचीत माझी भाषा किंवा शब्द रचना आपल्या लक्षात येत नसावी.
दुसरा मुद्दा चुकीचे स्ंदर्भ देण्याबाबत एक उदाहरण ,
- भटके कलावंत आणि भिक्षेकरी ह्या लेखात अनेक निषेधार्ह वाक्ये होती त्यातील एक वाक्य
- कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. यांच्या बायका लावण्या म्हणतात आणि गावातल्या तरुण पोरांना नादी लावतात. - ह्या साठी स्ंदर्भ मराठी विश्वकोषाचा दिलेला आहे.
विश्वकोषातील लेखकाने किंवा जेथुन स्ंदर्भ घेण्यात आले आहेत त्या लेखकाने, एकांगी पणे लिहिलेले हे वाक्य विश्वकोषात आहे म्हणुन अनेक जण त्याला प्रमाण मानु शकतात , पण मला तो शहाणपणा वाटत नाही व लेखकाचा हेतु दुजाभाव पणाचा वाटतो.
माझे प्रश्न केवळ ललित लेखन, संदर्भ रहित लेखन व ह्या लेखाच्या नावाबद्दल आहे.
--विकिकरण (चर्चा) ०२:१९, ३ ऑगस्ट २०१३ (IST)
धन्यवाद
संपादन"हे वाक्य विश्वकोषात आहे म्हणून अनेक जण त्याला प्रमाण मानू शकतात, पण मला तो शहाणपणा वाटत नाही व लेखकाचा हेतु दुजाभावपणाचा वाटतो." प्रमाण आहे हे मान्य केले याबद्दल धन्यवाद. कोल्हाट्यांच्या जीवनावर मराठीत भरपूर लिखाण झाले आहे. खुद्द कोल्हाटिणींनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या आत्मकथा (सत्यकथा) लिहिलेल्या आहेत. ही सर्व मंडळी अप्रामाणिक आणि दुजाभावधारी आहेत, असे वाटणे हाच अशहाणपणा आहे.
’लावण्या म्हणतात आणि तरुण पोरांना नादी लावतात’ हे वाक्य ’त्या’ लेखातून गाळले असले तरी ’तेच’ सत्य होते.
संदर्भ देणे ही काही फार अवघड गोष्ट नाही, ते पटणे ही फार फार अवघड गोष्ट आहे....J (चर्चा) १९:३१, ३ ऑगस्ट २०१३ (IST)
विपर्यास
संपादनतुम्ही पुन्हा माझा वाक्याचा विपर्यास केलात. मी प्रमाण मान्य केलेले नाही , याउलट अश्या वाक्यांना प्रमाण मानणाऱ्यांचा अशहाणपणा आहे असे मी लिहिले होते.
’लावण्या म्हणतात आणि तरुण पोरांना नादी लावतात’ हे वाक्य ’त्या’ लेखातून गाळले असले तरी ’तेच’ सत्य होते. - हे तुमचे वयैक्तीक मत (+ सर्वांसाठी प्रमाण असा हट्ट) असेल तर ह्या विषयी चर्चा करण्यासाठी काही राह्तच नाही. अप्रामाणिक आणि दुजाभावधारी व्यक्तीशी तर्कसंगत व मुद्देसुद चर्चा करणे अशक्य असते.
तुमच्या वयैक्तीक, राजकीय मतांबाबत विकि वरिल स्ंदर्भ रहित ललित लेखनासाठी शुभेच्छा.
तुमचे मत
संपादन’ते’सत्य नाही हे तुमचे वैयक्तिक मत, ते सर्वांसाठी प्रमाण का असावे? त्या मानाने, मराठी विश्वकोश हा सर्वांसाठी अधिक प्रमाण आहे. आणि हो, मला कुठलीही राजकीय मते नाहीत. मी निवडणुकांत दिलेले माझे मत माणूस पाहून दिलेले असते, पक्ष किंवा जातपात-धर्मबिर्म पाहून दिलेले नसते......J (चर्चा) ११:५३, ५ ऑगस्ट २०१३ (IST)