चर्चा:क्लिनिकल रिसर्च
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Abhijeet Safai in topic युक्ती- प्रयुक्ती -प्रयुक्ता ? खटकते
फेज चे भाषांतर टप्पा हे बरोबर आहे पण त्यामुळे सामान्य वाचकास बोध होणार नाही. त्यामुळे ते फेज असेच ठेवावे असे मला वाटते. आभिजीत १७:०७, २९ सप्टेंबर २०१२ (IST)
- phase en etymology = चंद्र कले, कले ने वाढतो
- phase करिता मराठीत अवस्था आणि प्रावस्था हे शब्द पण उपलब्ध आहेत पण या लेखात फेज आणि टप्पा ठिक वाटतात.
- संकेत (चर्चा) २३:११, २९ सप्टेंबर २०१२ (IST)
युक्ती- प्रयुक्ती -प्रयुक्ता ? खटकते
संपादन- प्रयुक्त्याच्या जीवावर बेतू शकते
- प्रयुक्ताचे काहीही बरेवाईट यात होऊ शकते.
- प्रयोग ज्यांच्यावर केले जातात ते प्रयुक्त रुग्ण असतात
- या टप्प्यात प्रयोगासाठी साधारणतः ३०० ते ३००० प्रयुक्त असतात.
संकेत (चर्चा) २३:११, २९ सप्टेंबर २०१२ (IST)
- मराठीत subject (ज्याच्यावर प्रयोग केला जातो तो) ला प्रयुक्त असे म्हणताना मी काही मानसशास्त्राच्या (मराठी) पुस्तकात वाचले आहे. म्हणून प्रयुक्त हा शब्द मला योग्य वाटतो. प्रयुक्त म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केला जातो. रुग्ण आणि प्रयुक्त हे एकच असू शकतात तसेच भिन्नही असू शकतात. जरी बहुतेक प्रयोग रुग्णांवर केले जातात तरी प्रयुक्त subject ही अथवा तत्सम संज्ञा वापरणेच योग आहे. त्यांच्या हक्कात आणि कर्तव्यात अनेक गुंतागुंतीचे बदल असल्याने subject ला subject म्हणणेच योग्य आहे. कुठला प्रतिशब्द वापरावा हे आपण ठरवू शकतो. मला तर प्रयुक्त हा शब्द योग्य वाटतो. पारिभाषिक असल्यामुळे तो थोडा विचित्र वाटतो, पण असे अनेक शब्द विचित्र वाटतात. आभिजीत ११:४०, १ ऑक्टोबर २०१२ (IST)
- पाश्चिमात्य जगात उत्पन्न झालेल्या ज्या ज्या ज्ञानशाखा आहेत, त्या सर्वांचे भाषांतर करताना हीच डोकेदुखी होत असते. काही शब्द तर जसे च्या तसे घ्यावेत असे माझे मत आहे. थोडे विषयांतर करून मला येथे नमूद करावेसे वाटते की कधी कधी एखादे भाषांतर फारच हास्यास्पद होते. उदा. cerebrospinal fluid (मेंदूची जी आवरणे असतात त्यातील द्रव पदार्थ, ज्यामध्ये मेंदू तरंगत असतो) चे भाषांतर काय करावे? तर "ब्रम्होदक"!!! इतर ठिकाणी आपल्याला नाही कळले तर आपण सोडून देऊ शकतो. पण अर्थ न कळल्याने माझे परीक्षेतील मार्क गेले :(. असो. आभिजीत ११:५३, १ ऑक्टोबर २०१२ (IST)