चर्चा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना
खालील मजकूरात योग्य ते बदल करुन लेखात घालावा. अभय नातू १६:५०, ३ एप्रिल २०११ (UTC)
- धोणीने मारेला शेवटचा षटकार "आपला हेलिकॉप्टर शॉट मारीत" नव्हता.
Maihudon ०८:३४, ६ एप्रिल २०११ (UTC)
अखेर टीम इंडियाने विश्व विजेतेपद जिंकून क्रिकेटचे जग जिंकले! धोनीच्या धुरंधरांनी भारतीय क्रिकेटच्या पंढरीत अब्जावधी भारतीयांचे स्वप्न साकार केले. कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान आणि आता एकदिवसीय क्रिकेटमधील अजिंक्यचपद. खऱ्या अर्थाने भारत क्रिकेटमधील सुपरपॉवर झाला आहे. हे यश देशभरात अभूतपूर्व जल्लोषात साजरे होत आहे.
या सुवर्ण दिवसाची गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आला आहे. आता २ एप्रिल २०११ हा दिवस प्लॅटेनियमने लिहिला जाईल. कुलसेकराचा चेंडू धोनीने प्रेक्षकांमध्ये भिरकावला त्या क्षणी अख्खा भारत आनंदोत्सवात न्हाऊन निघाला. खेळाडू बेभान होऊन नाचत होते. खच्चून भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये "जय हो...' आणि "चक दे इंडिया'चा नारा निनादत होता.
आजच्या यशाचा शिल्पकार ठरला कर्णधार धोनी. आघाडीवर राहून सेनापतीने युद्ध जिंकून द्यावे, तशा आवेशात तो लढला. दमला होता, थकला होता; पण त्याने सचिनला दिलेला शब्द खरा करून दाखविला. या अजिंक्यणपदानंतर संपूर्ण संघाने धोनीला नव्हे, तर सचिनला खांद्यावर घेऊन स्टेडियमध्ये विजयी फेरी मारली त्या वेळी सर्व जण धन्य झाले होते. कारण सचिनला विजेतेपदाची भेट द्यायची आहे, हा शब्द संघातील सर्वच खेळाडूंनी खरा करून दाखविला होता.
या विश्वाकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत लढाया जिंकणाऱ्या भारताने अंतिम सामन्याचे हे युद्ध ६ गडी आणि १० चेंडू राखून जिंकले. सेहवाग आणि सचिन बाद झाल्यानंतर किल्ला एका बाजूने लढविणाऱ्या गंभीरने ९७ धावांची भक्कम कामगिरी केली, परंतु या विजेतेपदावर भारताचाच हक्क आहे हे सिद्ध करताना धोनीने ७९ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकरांसह नाबाद ९१ धावा फटकवल्या. विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना त्याने मारलेला षटकार भारतीय क्रिकेटची मैदानावरची श्रीमंती दाखविणारा होता.
जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा खरे तर वेगवान आणि तेवढ्याच ठोस सलामीची गरज असते. सेहवाग आणि सचिन असे स्फोटक सलामीवीर असल्यावर खरे तर काळजीचे कारण नव्हते; पण "भरवशाच्या म्हशीला...' ही म्हण उगाचच पडली नाही. इनिंग ब्रेकनंतर प्रेक्षक पुन्हा आपल्या जागेवर यायच्या आत सेहवाग दुसऱ्याच चेंडूवर परतला. त्यामुळे दुसऱ्या बाजूला सचिनला आखलेल्या योजना बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या. तरीसुद्धा त्याने षटकामागे पाच धावांची सुरवात कायम ठेवली होती. पण मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी मलिंगाने त्याला बाद केले. सचिन तंबूत परतत असताना अख्ख्या स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली होती.
तंबूत परतत असताना सचिनने पुढचा फलंदाज कोहलीला, "उभा राहा, कोणत्याही परिस्थितीत विकेट फेकू नको,' असा सल्ला दिला आणि तो कोहलीने अमलात आणला. धावा किती करायच्या आहेत, आव्हान किती वाढत आहे या सर्व गणितांचा विचार न करता त्याने आणि त्याचा दिल्लीकर सहकारी गंभीरने गड पडू दिला नाही.
लढाई सुरू होती... भारतीय बॅकफूटवर होते, पण मनाने खंबीर होते. तेवढ्यात दिल्शानने स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा अप्रतिम झेल घेतला. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज लयबद्ध मारा करत होते, अशा वेळी युवराजऐवजी धोनीने स्वतः फलंदाजीस येण्याचा निर्णय घेतला आणि धावफलकावरील आकडे पटापट बदलू लागले आणि बघता बघता १०० चेंडूत १०० धावांची गरज.... ७८ चेंडूत ७९ धावांची गरज... ६० चेंडूत ५४ धावांची गरज अशी समीकरणे बदलू लागली आणि चाहत्यांचा मूडही पालटू लागला.
धोनी-गंभीर ही जोडी फोडण्यासाठी श्रीलंका कर्णधार संगकाराने मलिंगा आणि कुसलेकर असा दुतर्फी मारा सुरू केला. पण धोनीने त्याच्या खास शैलीतील दे घुमा के असे अविश्वदसनीय फटके मारून जान आणली. एकेक पाऊल पुढे टाकले जात होते. तेवढ्यात गंभीरला खराब फटका मारण्याचा मोह झाला; त्यामुळे त्याचे शतक तीन धावांनी तर हुकलेच; पण प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोकेही वाढले. ४५ षटकांनंतर पॉवर प्ले सुरू झाला. दडपण वाढलेले होते, पण धोनी आणि युवराज यांनी या वेळी पॉवर प्लेमध्ये आपली पॉवर दाखविली आणि १० चेंडू शिल्लक ठेवूनच बाजी मारली.
भारताने विश्वचषक जिंकताच वानखेडेच्या क्रिडांगणावरदेखील भारतीय क्रिकेटवीरांचा उत्साह ओसंडू लागला. एकमेकांना मिठय़ा मारून जल्लोषात झोकून देताना अनेकांनी आनंदाश्रूंनाही मुक्तपणे वाहू दिले. सचिन तेंडुलकरला पठाणने आपल्या डोक्यावर घेतले आणि इतर खेळाडूंच्या साथीने जेव्हा प्रेक्षकांचे अभिनंदन स्वीकारीत सचिनने क्रिडांगणाला फेरी घातली तेव्हा अवघ्या क्रिकेटप्रेमींना आनंदाचे भरतेच आले.. आपण विश्ववेजेते आहोत, या जाणिवेने उर भरून आला.. सुशोभिकरणानंतरचा वानखेडेवरचा हा पहिलाच सामना मुंबापुरीचीही शान अबाधित करणारा ठरला..
गंभीरचे शतक थोडक्यात हुकले
संपादनपहिल्याच विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करणारा गौतम गंभीरचे एकदिवसीय कारकिर्दीतील १० वे आणि विश्वकरंडक स्पर्धेतील पहिले शतक थोडक्यात हुकले. गंभीरने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये चार अर्धशतके केली आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाले असताना खेळण्यास आलेल्या गंभीरने संयमी आणि जबाबदारीने फलंदाजी केली.
गंभीरने ही आपल्या ९७ धावांची खेळी १२२ चेंडूत ९ चौकारांसह साजरी केली. तसेच गंभीरने एकदिवसीय कारकिर्दीत चार हजार धावा पूर्ण केल्या. गंभीरची ९ शतके आणि २३ अर्धशतके झाली आहेत. गंभीरने तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीबरोबर ८३ धावांची भागिदारी केली. कोहली बाद झाल्यानंतरही गंभीरने आपला लक्ष्य ढळू न देता कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर शतकी भागिदारी केली. गंभीरची ही खेळी भारताला धावांचे अव्हान पाठलाग करताना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
झहीरची सुरेख सुरवात
संपादन२००३ च्या विश्वेकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झहीरने सुरवातीच्या षटकात स्वैर मारा केला होता आणि त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दणकेबाज सुरवात केली होती. त्या वेळी केलेली चूक या वेळी होणार नाही याची काळजी घेणाऱ्या झहीरने स्वतःची पहिली तीन षटके निर्धाव टाकली आणि अडखळत खेळणाऱ्या थरांगाला चौथ्या षटकात एका सुंदर ऑउटस्विंगवर बादही केले. फार काळ संयमी फलंदाजी करणे दिल्शानच्या स्वभावात बसणारे नव्हते. झहीरविरुद्ध धावा करणे सोपे नसल्यामुळे त्याने अर्थातच श्रीशांतकडे मोर्चा वळविला. बाराव्या षटकापर्यंत संयम बाळगल्यानंतर अचानक पुढच्या षटकात श्रीशांतवर हल्ला चढविला. खेळपट्टीच्या निषिद्ध भागात येत असल्यामुळे श्रीशांतला इशारा मिळाला. त्यामुळे सैरभैर झाल्याने त्याने एक नोबॉलही टाकला. या षटकात १५ धावा वसूल झाल्यामुळे श्रीलंकेच्या डावाला थोडी गती मिळाली. पण हरभजनसिंगला गोलंदाजी देण्याचा बदल निर्णायक ठरला; कारण त्याने पवित्रा बदललेल्या दिल्शानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
संगकारा आणि जयवर्धने कोणत्याही परिस्थितीत भारतीयांना सहजासहजी विकेट देणार नाहीत हे उघड होते. परंतु पुन्हा ऐन मोक्याभवर युवराज संघाच्या मदतीला धावून आला आणि त्याने संगकाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
श्रीलंकेचा डाव अंतिम टप्प्यात असताना धोनीने झहीर खानला गोलंदाजी दिली आणि त्याने कपुगेदाराला बाद केले. सलग दोन षटकांत दोन फलंदाज बाद झाल्यामुळे एका बाजूने किल्ला लढविणाऱ्या जयवर्धनेने आक्रमण करण्याचा बेत पुढे ढकलला आणि फलंदाजांच्या पॉवर प्लेची वाट पाहिली. अखेरच्या पाच षटकांतील पॉवर प्लेमध्ये जयवर्धने-कुलसेकरा-परेरा यांनी ६३ धावांचा धुमधडाका केला. पहिली तीन षटके निर्धाव टाकणाऱ्या झहीर खानने अखेरच्या तीन षटकांत धावांची उधळण केली.
धावफलक : श्रीलंका - उपुल थरंगा झे. सेहवाग गो. झहीर 2 तिलकरत्ने दिल्शान त्रि. गो. हरभजनसिंग 33 कुमार संगकारा झे. धोनी गो. युवराज 48 माहेला जयवर्धने नाबाद 103 थिलन समरवीरा पायचीत गो. युवराज 21 चमारा कपुगेदरा झे. रैना गो. झहीर 1 नुवान कुलसेकरा धावबाद (धोनी) 32 थिसरा परेरा नाबाद 22 अवांतर (बाइज 1, लेगबाइज 3, वाइड 3, नोबॉल 2) 12 एकूण 50 षटकांत 6 बाद 274 गडी बाद होण्याचा क्रम : 1-17, 2-60, 3-122, 4-179, 5-182, 6-248 गोलंदाजी : झहीर खान 10-3-60-2 एस. श्रीशांत 8-0-52-0 मुनाफ पटेल 9-0-41-0 हरभजनसिंग 10-0-50-1 युवराजसिंग 10-0-49-2 सचिन तेंडुलकर 2-0-12-0 विराट कोहली 1-0-6-0
नाणेफेक हरल्याचे संगकाराला माहीत होते
संपादनअंतिम सामन्यात नाणेफेक करताना कुमार संगकाराने 'चिडीचा डाव' खेळल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे. संगकाराला आपण प्रथम नाणेफेक हरल्याचे माहीत होते, तरीही त्याने चोरटा मार्ग शोधीत पुन्हा एकदा नाणेफेक करण्यास सांगितल्याचे वॉनने म्हटले आहे.
भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करीत २८ वर्षांनंतर विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याला नाणेफेक उडविण्यावरून वादाला सुरवात झाली. नाणेफेक करताना संगकारा काय म्हणाला होता हे सामनाधिकारी जेफ्री क्रो यांनी ऐकले नसल्याने पुन्हा नाणेफेक करण्यात आली. दुसऱ्यांदा नाणेफेक केल्यानंतर संगकाराने नाणेफेक जिंकली. याबाबत वॉनने ट्विटरवर म्हटले आहे की, नाणेफेक करताना संगकाराने 'टेल्स' म्हटल्याचे मला स्पष्ट ऐकू आले होते. मात्र, संगकाराने चिडीचा डाव खेळत धोनीला दगा दिला आणि पुन्हा नाणेफेक करण्यास सांगितले.