चर्चा:केन्या
केनिया or केन्या?
अभय नातू 03:05, 2 जानेवारी 2007 (UTC)
- अभय, मराठी वृत्तपत्रीय लिखाणात 'केनिया' असे लेखन बर्याच प्रमाणात वापरले जाते. माझ्या स्मृतीत तसेच लेखन पक्के असल्याने मागे कधीतरी मी 'केन्या' पानाचे 'केनिया' पानाकडे स्थानांतर केले होते. वृत्तपत्रांखेरीज मराठी विश्वकोशात इंग्लिश लेखन/उच्चाराप्रमाणे 'केन्या' असे लेखन आहे (संदर्भ: मराठी विश्वकोश: खंड ४ (PDF फाईल - 114 kB)).
- एकंदरीत विचार करता, 'केन्या' हे पान मुख्य ठेवून केनियावरून 'केन्या' या मुख्य पानाला पुनर्निर्देशिण्यास हरकत नाही असे मला वाटते.
- --संकल्प द्रविड 05:27, 2 जानेवारी 2007 (UTC)
विकिपीडियावरील मजकुराची शाषा ही विश्वकोशाच्या वापरापेक्षा सर्वसामान्य वापराच्या अधिक जवळची असावी. हे खरे आहे की अनेकदा, सर्वसामान्य वापरात अनेक शब्दांच्या उच्चारात वा अर्थात विपर्यास होतो, व कधीकधी हा विपर्यास विकिपीडियाने दुरुस्त करणे रास्त असते. मात्र कधीकधी हे शब्द जनमानसात एव्हढे रूढ होतात की जुन्या शब्दाचे ते नवे रुप आहे, किंबहुना तो नवीन शब्द आहे हे मान्य करून तोच नवीन शब्द वापरणे योग्य असते. येथेदेखील, केन्या हा उच्चार कोणीही वापरत नाही. मराठीत सर्वत्र केनिया हा उच्चार प्रचलित आहे. इंग्लिश लोकही ह्याचा उच्चार 'केनिया' असा स्पष्टपणे करतात. त्यामुळे तोच उच्चार वापरला जावा. मी केन्या हा लेख 'केनिया' ह्या लेखात स्थानांतरित करत आहे.
- --दीप्ती , १४ फेब्रुवारी २०१०
- सर्वसामान्यांना 'केनिया' या नावाने शोधल्यास केन्या या मूळ लेखाकडे आपोआप पुनर्निर्देशन मिळेल. खेरीज 'केन्या' या नावामागे 'माउंट केन्या' या नावावरून उद्भवलेल्या उत्पत्तीचीही कथा नजरेआड करता येत नाही.
- मूळ उच्चारांशी अधिकाधिक जवळचे लेखन मुख्य पानाचे शीर्षक ठेवून, अन्य लेखनभेद पुनर्निर्देशने म्हणून ठेवण्याच्या मराठी विकिपीडियाच्या रीतीशी केन्या हेच मुख्य पान असणे, सुसंगत वाटते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:४८, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)
- इंग्लिश विकिपीडियानुसार -- "The Republic of Kenya (pronounced /ˈkɛnjə/)..." म्हणून या लेखाला केन्या या शीर्षकाखालीच ठेवावे हे माझे मत आहे.
- अभय नातू ०४:०९, २९ मे २०१० (UTC)
Start a discussion about केन्या
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve केन्या.