लेखनाबद्दल तळटीप

संपादन
  • जाहिरातीच्या उद्देशाने नोंदी करू नयेत.स्वत:च्या नोंदी स्वत:करू नयेत अथवा जाणीवपुर्वक करवून घेऊ नयेत. संपर्क पत्ते संपर्क क्रमांक देऊ नयेत.
  • विकिपीडियात उल्लेखनीय व्यक्तींचीच नोंद होते.त्यामुळे प्रसिद्ध अथवा नामवंत आणि इतर सर्व प्रकारची विशेषणे लावणे आवर्जून टाळावे.
  • कीर्तनकार कोणत्या गावचे आहेत ते ओळखू येण्याकरता कंसात केवळ गावाचे नाव जन्मवर्ष, हयात नसतील तर मृत्यूवर्ष नमूद करावे.
  • पदांबद्दल इतर सर्वसाधारन विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी. ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१ पेक्षा अधिक वर्षे झाली असतील अशा कीर्तनकारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन करता येतील. निरूपण/कीर्तन कसे करावे याबद्दलची माहिती विकिबुक्स या बंधुप्रकल्पात लिहावी.

कीर्तन ही स्वतंत्र लोककला आहे. जे प्रवचनकार केवळ प्रवचन करतात त्याची नावे प्रवचनकार या लेखविभागात टाकणे विश्वकोशीयतेस अधीक सुसंगत असेल किंवा कसे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२०, २९ एप्रिल २०१३ (IST)Reply

निश्चित सुसंगत होईल. पण प्रवचनकारांची यादी लगेच उपलब्ध होईल असे नाही. आणि त्यांची संख्या जर कीर्तनकारांच्या तुलनेत अत्यल्प असेल त्यांच्यासाठी वेगळा लेखविभाग का करावा? केवळ कंसात प्रवचनकार असे लिहून भागावे...... J (चर्चा) १२:३५, ३ मे २०१३ (IST)Reply


@J:

प्रवचन#प्रवचनकार हा लेख विभाग रिकामा पडीक आहे आणि कीर्तनकार लेखात वाचता येणार नाही एवढी रांग लांबते चालली आहे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२७, २० सप्टेंबर २०१४ (IST)Reply


महाराष्ट्रात साडेतीन हजाराच्या आसपास कीर्तनकार आहेत, हे लेखात आलेच आहे. त्यात चार-दोन कीर्तनकारांच्या नावांच्या अगोदर प्रसिद्ध किंवा तशा अर्थाचे शब्द आले असतील. त्यामुळे या लेखात नाव आले की कीर्तनकाराची जाहिरात होईल असे नाही. नावे अक्षरानुक्रमे असल्याने यादीत चुकूनही एखाद्या कीर्तनकाराचे नाव दुबार येण्याची शक्यता नाही. सर्व कीर्तनकार संपले की यादीत भर पडणे थांबेल.

प्रवचन करणे हे कीर्तन करण्यापेक्षा तुलनेने सोपे असल्याने, प्रवचनकार खरे तर संख्येने खूप अधिक असायला पाहिजेत. पण त्यांची एकगठ्ठा नोंद कुठेच सापडत नाही. पुरेशी नावे मिळाली की या यादीतली काही नावे प्रवचनकार या लेखविभागात टाकायला हरकत नाही.....J (चर्चा) २३:४७, २० सप्टेंबर २०१४ (IST)Reply

"कीर्तनकार" पानाकडे परत चला.