चर्चा:किरणोत्सर्ग

Add topic
There are no discussions on this page.

खरे तर किरणोत्सर्गाची (किंवा प्रारणाची) खरी व्याख्या ऊर्जेचे अवकाशातील किंवा भौतिक माध्यमातील लहर किंवा कणांच्या स्वरूपातील उत्सर्जन किंवा प्रसार अशी आहे. आपल्याला डोळ्यांना जे दिसते ते देखील प्रारण किंवा किरणोत्सर्ग आहे. आपण ऊन्हात गेलो की अंगाला चटके बसतात. याचा अर्थ आपल्याला तो किरणोत्सर्ग "जाणवतो". त्यामुळे "किरणोत्सर्ग ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्याने तो आपल्याला जाणवत नाही" हे वाक्य चुकीचे आहे. काही किरणोत्सर्ग जाणवतात, काही जाणवत नाही. हा लेख फक्त जास्त वारंवारितेच्या (high frequency radiation e.g. X-rays, gamma rays) किरणोत्सर्गाचा विचार करून लिहिलाय असं दिसतय.

हा लेख प्रारण या लेखाकडे पुनर्निर्देशीत करून तो लेख जनरल किर्णोत्सर्गासाठी लिहावा किंवा याच लेखात योग्य ते बदल करावे.

"किरणोत्सर्ग" पानाकडे परत चला.