इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.


उपयोजित लेखनप्रकाराम्ध्ये 'कथालेखन' हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे.कल्पना ,नवनिर्मिती,स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतील..

कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात.

उदा.,

१.शौर्यकथा

२.विज्ञान कथा

३.रूपककथा

४.विनोदकथा

५.ऐतिहासिक कथा

६.बोधकथा

कथालेखन : कथाबीज,कथेची सुरुवात ,कथेतील घटक,कथेतील घटना व स्थळ, कथेतील पात्रे ,पात्रांचे स्वभाव विशेष,पात्रांमधील सवांद,विषयाला अनुसरून भाषा,कथेचा शेवट,शीर्षक इत्यादी घटकांचा समावेश कथालेखनात होतो.

कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे.कथाबीज हा कथेचा प्राण असतो.कथालेखन करताना कथाबिजाच्या विषयास अनुसरून दैनदिन निरीक्षण,वाचन,अनुभव, कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलवावे.कथेला प्रारंभ,मध्य व शेवट असावा.कथेची सुरुवात आकर्षक असावी.कथेमध्ये पाल्हाळीक नसावी.कथा हि नेहमी भूतकाळातच लिहावी.कथेचा मजकूर उत्कंठावर्धक असावा.कथेला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते.कथाबिजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. जे कथाबीजाला पुढे नेऊ शकतील. घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे.कथेचे वर्णन चित्रदर्शी असावे.


"कथा" पानाकडे परत चला.