चर्चा:उद्ध्वस्त विश्व

उध्वस्त विश्व कि उद्ध्वस्त विश्व?

अभय नातू १६:०७, २४ सप्टेंबर २००८ (UTC)

उद्ध्वस्त बरोबर आहे. उत्‌ + ध्वस्त (’ध्वस्‌’ या संस्कृत धातुपासून बनलेले कर्मणि भूतकालवाचक चातुसाधित विशेषण) = उद्ध्वस्त.
--संकल्प द्रविड (चर्चा) १६:२४, २४ सप्टेंबर २००८ (UTC)
मला वाटते उद्ध्वस्त बरोबर उध्वस्त विश्व देखील ठेवावे. असे लिहणे वर्तमानपत्रांत व इतर पुस्तकांत रुळलेलेल आहे. विध्वंस शब्द पण असाच आहे! बाकी तलावातले चांदणे असेच नाव अपेक्षित आहे. नजरचुकीने तलावतले चांदणे झाले होते. पण मी प्रत्यक्ष पुस्तक पाहिलेले नाही. ते कदाचित तलाव तले चांदणे म्हणजे तलावाच्या तळभागातले चांदणे असेही असू शकेल. ;-) ओले उन्ह हे देखील बरोबर वाटते. मी उन्हात बसलो होतो, किंवा उन्हात न्हाऊन निघणे असे सर्वत्र लिहलेले असते. जर उन हा शब्द असता तर उनात बसणे किंवा उनात न्हाऊन निघणे असे शब्दप्रयोग वापरले गेले असते. अर्थात इकडेतिकडे दिसणारी उदाहरणे मी दिली आहेत. याबाबत मला खात्रीलायक माहिती नाही.
---सौरभदा ०४:४७, २५ सप्टेंबर २००८ (UTC)
>>विध्वंस शब्द पण असाच आहे!
विध्वंस शब्द तसा नाही. ते वि + ध्वस धातुवरून बनलेले नाम आहे; ते विध्वंस असेच लिहिले जाते. मात्र (उ‌‌त्‌ + ध्वस्‌) धातुचे तसे होत नाही; ते कायम ’उद्ध्वस्त’ असेच लिहिले जाते.
बाकी, योग्य त्या दुरुस्त्या, पुनर्निर्देशने, स्थानांतरे मी करेन.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:०१, २५ सप्टेंबर २००८ (UTC)

Start a discussion about उद्ध्वस्त विश्व

Start a discussion
"उद्ध्वस्त विश्व" पानाकडे परत चला.