चर्चा:हायड्रोजन
शब्द सुयोग्यते बद्दल साशंकता
संपादन'उदजन' शब्द सुबोध अथवा उच्चारणास उपयोगास सहज वाटत नाही. शासकीय शब्द कोशातही सर्वत्र मुख्यत्वे हायड्रोजन शब्दच वापरला आहे . सेंसॉरशीपला अभ्यवेक्षण जसा जड वाटतो तसा उदजन त्याच्या वजनापेक्षा कठीण वाटतो.या पेक्षा अजून नवा मराठी शब्दही घडवण्यास हरकत नाही असे वाटते.
हायड्रोजनचा शोध लागला त्यावेळी पाणि दिसले म्हणून हायड्रोजन शब्द त्यांनी वापरला आता आपल्याला हायड्रोजनच्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत आपण शब्द बनवताना ऐतिहासिक चूका केल्याच पाहीजेत का. त्या शिवाय 'उद' अक्षरे सुरवातिस असतील तर सहसा मराठी भाषेची प्रकृती नंतरेचे अक्षर ठळक उच्चाराचे येते उदर,उदक,उदय, आणि आता वाचा उदज आणि मग उदजन वाचताना बोलताना जो शब्द कम्फर्टेबल नाही तो कितपत मराठी लोकांना रूचेल या बद्दल साशंकता वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१९, २४ मे २०१३ (IST)