चर्चा:अनित्य
माहात्म्य
संपादनक्षणभंगुर च्या पहिल्या संपादनात काही उदाहरणे देण्यात आलेली आहेत. ती अगदी अचूक आहेत. परंतु गंमत म्हणजे खरा निकष लावू जाता वस्तूमान, उर्जा व अवकाश(मग त्याचा जो काही अर्थ असेल त्या अर्थासह!) वगळता सारेच काही क्षणभंगुर ठरते. आणि या ज्यांचा म्हणून अपवाद आहे ते अत्यंत परिवर्तनशील आहेत व एकाच स्थितीत राहात नाहीत. त्यामुळे त्यांना रूपात्मक दृष्टीने क्षणभंगुरता असते. ही टीप फक्त क्षणभंगूरत्वाचे माहात्म्य तात्त्विक पातळीवर पाहाण्यासाठी आहे.
श्रीहरि ११:१०, ७ डिसेंबर २००७ (UTC)
ऊर्जा व द्रव्य हे सुद्धा परिवर्तनशील आहेत. (अल्बर्ट आइनस्टाइन E=m*c^2, At Big bang and before big bang) म्हणूनच गीतेचे सार असलेल्या ’विमोह त्यागून कर्मफलांचा...’ या गाण्यात म्हटले आहे: क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा...आणि गीतेमध्ये अपरिवर्तनशील, अविनाशी अशा आत्त्मतत्त्वाची, चैतन्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
हेरंब एम. ११:३४, ७ डिसेंबर २००७ (UTC)
अर्थात क्षणभंगुर नसलेल्यांनादेखील मी परिवर्तनशील म्हटलेले आहे. इतर क्षणभंगुरांचेच काय; परंतु परिवर्तनशीलतेचा गुणधर्म शाश्वत असलेल्या भौतिक बाबींनासुद्धा विनाअपवाद लागू होतो. आत्मा अर्थात चैतन्यशक्ती वेगवेगळ्या अनुभवतातून जाताना जाणिवेने समृद्ध होत जाते; घटना क्षणभंगुर असतात पण आलेले अनुभव जे संस्कार करतात ते चिरकाळ टिकणारे असतात.
आणि क्षणभंगुर नसलेल्या गोष्टीच खूप कमी असल्याने त्यांची उदाहरणे द्यायची झाल्यास वर उल्लेखलेल्या भौतिक विश्वातील उर्जा, वस्तूमान, (उद्भवणार्या वादाच्या स्वीकारासह एक विचारप्रवाहाचे मत म्हणून) अवकाश ही; आणि चिरशाश्वत अशी उदाहरणे म्हणजे आत्मा व त्याचा व सर्वस्वाचा आधार असलेला परमेश्वर (जो अर्थ घ्यायची ज्यांची जी इच्छा आहे तो सर्वमयी) ही होत.
बाकी, क्षणभंगुर हा शब्द फार कमी काळ अस्तित्व टिकवू शकणार्या पदार्थांना जास्त शोभून दिसतो.
श्रीहरि ११:५२, ७ डिसेंबर २००७ (UTC)