चर्चा:अनागरिक धम्मपाल
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822 in topic लेखाचे शीर्षक नाव दुरुस्ती करणे गरजेचे आहे
लेखाचे शीर्षक नाव दुरुस्ती करणे गरजेचे आहे
संपादनलेखाचे शीर्षक नाव दुरुस्ती करणे गरजेचे आहे- LAXMANSALVE
- @LAXMANSALVE: इंग्लिश विकिपीडियावरील लेख Anagārika या शब्दाचा अनुवाद "अनगारिक" असा आहे. ga - ग ; gā - गा. यावर आपण काय म्हणाल? --संदेश हिवाळेचर्चा ०८:२१, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)
- अनागरिक का अनागारिक?
- गूगल वर दोन्ही शब्द आहेत.
- मराठी/हिंदी/संस्कृत भाषेनुसार - नागरिक म्हणजे नगरात राहणारा, म्हणजे 'घर-गृहस्थ'. तर, अनागरिक म्हणजे 'घर-संसाराचा' त्याग केलेला. आता मुख्य मुद्दा असा आहे की अनागारिक हा शब्द पाली आहे का सिंहली भाषेतील हे पण प्रथम माहीत करून घेणे आवश्यक आहे. जर तसे असेल तर मग, तो त्या भाषेत तो कसा उच्चारला जातो हे पण माहीत करून घ्यावे लागेल. कारण भाषेनुसार उच्चार बदलतो. अजून संशोधन केले पाहिजे. - संतोष गोरे ( 💬 ) ०८:४३, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)
माझे मत अनागरिक
संपादनइंग्रजी भाषेतील Ga गा किंवा Ga ग असे संबोधले जाते, उदा.इंग्रजी मधील Ramesh मराठीत रमेश असे लिहितात. तुम्ही त्यास रामेश असे इंग्रजी प्रमाने म्हणू शकाल परंतु मराठी भाषेत त्यास तुम्हाला रमेश असेच म्हणावे लागेल, तसेच अनागरिक यांचे आहे.लेख मराठीमध्ये असल्यास, त्या शब्दात सांगायचे झाल्यास तुम्हाला अनागारिक असे म्हटल्यास त्यास मराठी मध्ये काही अर्थ प्राप्त होत आहे काय????? हे पाहावे लागेल , तसे होत नसल्यास अनागरिक म्हणजेच घर नसलेला, अपरिग्रह, व्यक्ती जो बौद्ध भिक्षु असतो LAXMANSALVE (चर्चा) ०९:४८, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)
@LAXMANSALVE आणि Sandesh9822:
- कृपया फरक लक्षात घ्यावा, सदर व्यक्ती ही सिंहली होती. त्यामुळे उच्चार त्यानुसार घ्यावा लागेल.
- १. si:අනගාරික ධර්මපාල हा सिंहली भाषेतील लेख आहे त्यामुळे අනගාරික ධර්මපාල शब्द translate.google.com वर भाषांतरित केला असता त्याचा उच्चार हा 'अनगारिक धर्मपाल' असा होतोय. गुगल ट्रान्सलेट वर आपणास एक स्पीकर चे चिन्ह दिसेल, कृपया ते दाबून तुम्ही उच्चार ऐकू पण शकता.
- २. संदेश यांनी म्हटल्या प्रमाणे सदरील लेखाचे इंग्रजी नाव Anagārika Dharmapāla असे आहे. LAXMANSALVE यात एक नीट समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे a चा उच्चार 'अ' असा होतो, तर ā चा उच्चार हा 'आ' असा होतो. तेव्हा Anagārika Dharmapāla आणि අනගාරික ධර්මපාල या दोन्ही शब्दांचा उच्चार हा 'अनगारिक धर्मपाल' असा होतोय.
- ३. याव्यतिरिक्त ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये पण Anagārika Dharmapāla असेच नोंदवलेले आहे. पुनश्च स्मरण - a=अ आणि ā=आ.
- कृपया यावर आपले मत कळवावे- संतोष गोरे ( 💬 ) १४:४०, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)
- मराठी मध्ये त्यांना अनागरिक धर्मपाल म्हणून संबोधतात , आपण असा नविन प्रचार विकिवर केल्यास त्याला काही अर्थ उरनार नाहीं असो ......! 103.206.55.69 १६:३६, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @LAXMANSALVE आणि संतोष गोरे: वरील संपूर्ण चर्चा वाचल्यानंतर असे वाटते की "अनागरिक" शब्द मराठी विकिपीडियावर वापरणे योग्य राहील. इंग्लिश वा सिंहली/पाली उच्चार "अनगारिक" येथे अर्थपूर्ण ठरत नाही. लेख शीर्षक बदलले आहे.--संदेश हिवाळेचर्चा १८:०७, ८ नोव्हेंबर २०२१ (IST)