Edited Awards & FIlms Sections Swapnilprakashpatil १३:०५, १ जुलै २०१० (UTC)

वादग्रस्त माहिति विषयी मदत हवी आहे. Swapnilprakashpatil ०६:२६, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

दृष्टिकोन साचा लावण्यामागचे कारण लेखनाची शैली आहे. उदा - चित्रपटाच्या संगीतानंतर त्यांनी रसिकांच्या मनात घर करायला सुरूवात केली. या वाक्यातून कोणतेच सत्य (fact) ध्वनित होत नाही. तसेच यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून गाऊन घ्यावयाची होती पण काही कारणास्तव योग जुळाला नाही याने माहितीत भर पडत नाही. नुसते यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती अजय गोगावलेच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. असे लिहावे. जर या आरतीच्या ध्वनिमुद्रणावरुन मंगेशकर व अजय अतुल यांच्यात काही वादविवाद, इ. नोंद घेण्याजोगी बाब घडली असती तर मंगेशकरांचे नाव उद्धृत करण्यात हशील आहे. अजून एक उदाहरण म्हणजे जे रसिकांना भावले. - म्हणजे नक्की काय? त्याच्या अनेक प्रती विकल्या गेल्या का? या गाण्याने एखाद्या क्रमवारीत वरचे स्थान मिळवले का? असे असल्यास वरील वाक्य जरुर लिहावे (अर्थात त्यामागचे कारण उद्धृत करुनच).
असो. अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास निःसंकोच कळवावे.
अभय नातू १५:५५, ७ सप्टेंबर २०१० (UTC)
धन्यवाद !!! लेखन शैली व लेखा मध्ये य सूचना लक्षात घेऊन विशेष बदल करण्यात येतील.!!

Swapnilprakashpatil ०७:४०, ९ सप्टेंबर २०१० (UTC)

"अजय-अतुल" पानाकडे परत चला.