चर्चा:अंधश्रद्धा निर्मूलन

Latest comment: १० वर्षांपूर्वी by नंदकिशोर म कुबडे

भारतीयसत्य शोधक या नावाखाली कित्येकांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विचार,तत्व आणि सिद्धांत मांडले परंतु त्यांनी मांडलेले सिद्धांत सत्यच आहेत हे सिद्ध होऊ शकले नाहीत त्यांनी आपले मत व्यक्त करण्याचा मार्ग निवडला आणि तो जगाला पटउन सागण्याचा प्रयत्न केला उदा:देव आहे काय ? याचे उत्तर देतांना होय,नाही आहेतर कोठे आहे .माणूस ,आत्मा मूर्ती,नीर्गुण,सगुण,शक्ती अशा अनेक प्रकारची उत्तरे मिळतात त्यात सत्य काय आहे हे शोधण्या ऎवजी आपले मत समाजावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न गेला .जसे अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे दोन भाग झालेत आणि त्यवर तत्व व सिद्धांताचे मनोरे उभे केले वस्तुत:श्रद्धा हि आंधळीच असते. डोळस श्रद्धा असूच शकत नाही ज्याप्रमाणे अंधश्रद्धा हा शब्द वापरात येतो तसाच डोळस श्रद्धा हा शब्द वापरात येत नाही तो शब्द अस्तित्त्वातच नाही तरीही यांनी वांझेच्या पुत्राचे बारसे केलेच दुस-या एका संशोधन काराने सांगितले कि ज्ञानेश्वर महाराज झालेच नाही कारण ज्ञानेश्वर महाराज हे एक आहेत कि तीन आहे हे कळतच नाही त्यने ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी व अभंगाच्या रचनेवरून सिद्ध करून दाखविले काही लोकांना ते पटले. असे संशोधक सिद्धांत मांडतात तर त्यांनाबुद्धिवान म्हणावे कि मूर्ख तेच कळत नाही जेव्हा त्याची बुद्धी काम करत नाही तेव्हा ते म्हणतात हे सर्व काल्पनिक आहे हा त्यंचा शेवटचा पर्याय असतो गुलाबराव महाराज म्हणतात तर्काने सत्त्यता सिद्ध करता येते परंतु तो तर्क जे सिद्धकरायचे आहे त्याच्या अनुसरून असला पाहिजे विद्रूप असल्यास सत्त्यता सिद्ध करता येत नाही ह्या जगात असंख्य अशी तत्वे आहेत कि जे सिद्ध करता येत नाही कुठलेही पुरावे नसतांना, कुठलेही ज्ञान नसतांना आपण त्याचा श्रद्धेने स्वीकार करतो उदा;डॉक्टर,वकील ,संत ,कायधा ,देव माता पिता , वैज्ञानिक ,अशा किती तरी ठिकाणी आपण अंधश्रद्धा वापरतो कारण आपल्या कुठल्याहि वस्तूचे परिपूर्ण ज्ञान नसते याचाच आपण सर्व अंधश्रद्धा च वापरतो त्याच निर्मुलन कसे कराल आणि दुसर्याचा अनुभव हा आपले ज्ञान होऊ शकत नाही . जयहिंद नंदकिशोर म कुबडे (चर्चा) १०:५५, ३० ऑक्टोबर २०१४ (IST) वारकरी पंथ हा विश्वधर्म होणार असे श्री संत गुलाबराव महाराज म्हणतात .Reply

"अंधश्रद्धा निर्मूलन" पानाकडे परत चला.