२२वे चतुरंग रंगसंमेलन : हे संमेलन माटुंगा येथे २९-३० डिसेंबर २०१२ या काळात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने हे रंगसंमेलन नाट्य, साहित्य आणि संगीत अशा तिन्ही कलाप्रकारांनी युक्त असेल.

विक्रम गोखले यांच्या हस्ते या २२व्या रंगसंमेलनाचे उद्घाटन होणार असून नाट्यसमीक्षक कमलाकर सोनटक्के स्वागताध्यक्ष आहेत. अभिनेते-दिग्दर्शक राजन ताम्हाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होईल. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ' आजची रंगभूमी , आजचे रंगकर्मी ' या विषयावरील चर्चेत अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि चिन्मय मांडलेकर सहभागी होणार असून दिग्दर्शक केदार शिंदे त्यांची मुलाखत घेणार आहेत. विजयाबाईंचे ' व्यक्तिमत्त्वदर्शन ' या कार्यक्रमात विक्रम गोखले , नाना पाटेकर , तुषार दळवी , अजित भुरे , मंगला खाडिलकर , विनय आपटे , नीना कुलकर्णी आदी अनेक कलाकार मंडळी सहभागी होणार असून विजयाबाईंवरील लेखांचे वाचन आणि अनुभव कथन करणार आहेत. याशिवाय विजयाबाईंच्या समग्र कारकिर्दीवर आधारित एक चित्रफीतही यावेळी दाखविण्यात येणार आहे.

रंगसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबरला कलाकार आणि रसिक यांच्यात संवाद घडवून आणणारे चहापान संमेलन दुपारी ४ ते साडे पाच यावेळेत होणार आहे. नांदी आणि संगीत नाटकांचे नाते उलगडून दाखविणारा ' नांदीदर्शन ' हा कार्यक्रम ललितकलादर्शचे कलाकार या दिवशी सादर करणार आहेत. याशिवाय कलापिनी कोमकली आणि देवकी पंडित यांचा उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. रंगसंमेलनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या जीवनगौरव पुरस्कार समारंभात विजयाबाईंना ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

यापूर्वीची रंगसंमेलने

संपादन


पहा :

चतुरंग प्रतिष्ठान