चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. मध्य प्रदेश, राजस्थानउत्तर प्रदेशांतून ती वाहते. मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम आहे. उत्तर प्रदेशातील साहोन गावाजवळ तिचा यमुनेशी संगम होतो. चंबळ नदीची एकूण लांबी ९६० किमी असून बागरी, क्षिप्रा, चामला, सिवाना, ब्राह्मणी व कराल या तिच्या उपनद्या आहेत. मध्य प्रदेशातील चंबळचे खोरे हे तेथील घनदाट अरण्य व तेथे आश्रय घेऊन राहणाऱ्या डाकूंसाठी कुप्रसिद्ध आहे.