चंद्रशेखर महाराज देगलूरकर


ह.भ.प. श्री चंद्रशेखर एकनाथमहाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. ते वेदान्ताचे तसेच श्रीमद्भगवतगीता, ब्रह्मसूत्रभाष्य, विवेकचूडामणी आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, अशा श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक आहेत. ते एकनाथमहाराज देगलूरकर यांचे सुपुत्र आहेत.

श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर
[[Image:
|220px| ]]
मूळ नाव चंद्रशेखर एकनाथमहाराज देगलूरकर
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी संप्रदाय
भाषा मराठी भाषा
साहित्यरचना संत्संग
कार्य प्रवचन, कीर्तन
संबंधित तीर्थक्षेत्रे पंढरपूर, आळंदी , देहू, पशुपतिनाथ
वडील एकनाथ महाराज देगलूरकर
विशेष माहिती श्रीमद्भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचे अभ्यासक

भागवत कथा आणि कीर्तन

संपादन


गुरू परंपरा माहिती

संपादन

संत श्रेष्ठ श्रीज्ञानदेवांपासून निर्माण झालेल्या ‘ भागवत परंपरा ‘ पैकी एक जी श्रीज्ञानदेव , श्रीसोपानदेव , श्रीविसोबा , श्रीनामदेव महाराज या केमाने पुढे विकसित होत गेली . तर दुसरी योग परंपरा या नावाने ओळखली जाणारी परंपरा . श्री ज्ञानदेव , श्री सत्यमलनाथ , श्रीगैबीनाथ , श्रीउद्बोधनाथ , श्री केसरीनाथ , श्रीशिवदिननाथ या क्रमाने पुढे प्रवाही होत गेली . या परंपरेचा अभ्यास संत साहित्याचे व मराठी वाड्मयाचे अभ्यासकांनी केला , त्यावर भरपूर लेखनही केले . परंतु या परंपरेच्या मालिकेत तिसऱ्या परंपरेचा विसर संत व मराठी साहित्याचे अभ्यासक यांना झालेला दिसतो . ही परंपरा श्रीज्ञानदेव , श्रीदेवनाथ महाराज , श्रीचूडामणी , श्रीगुंडानाथ (प्रथम) अशी मानली जाते . प्रथम गुरुपरंपरेतून आलेली आणि पुढे गुरू आणि वंश परंपरेने विकसित होत गेली .

   श्रीज्ञानदेवांच्या नंतर बऱ्याच कालावधीने श्रीदेवनाथ नावाचे साधुपुरुष होऊन गेले . त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनेच्छेने आळंदीत ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे करूनही त्यांना ज्ञानदेवांनी दर्शन दिले नव्हते . श्री ज्ञानदेवांच्या भेटीस आपण अपात्र असून , ती भेट घडवून आणण्यास अपात्र असणारी जीभ शरीरात ठेवून तरी काय उपयोग ? असा विचार करून एका तीक्ष्ण हत्याराने ती कापून टाकली होती . हा त्यांचा आत्यंतिक श्रद्धाभाव पाहून ज्ञानदेव प्रगट झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने देवनाथांची जिव्हा पूर्ववत केली . त्यांच्या मस्तकावर करकमल ठेवला व शांभव असे अद्वयानंदाचे संत निवृत्तीनाथां पासून प्राप्त झालेले वैभव देवनाथाना देऊन त्यांना महेशाच्या तुलनेत उतरविले होते . या देवनाथानी देगलूर येथील ‘ श्री चूडामणी ‘ नामक एका सत्पात्री साधकाला हे अद्वयानंदाचे वैभव देऊन ऋषीऋणातून मुक्त होण्याचे ठरवले . श्रीज्ञानदेवांपासून प्राप्त झालेला बोध त्यांनी श्रीचूडामणी यांना देऊन कृतार्थ केले . हेच श्रीचूडामणी महाराज श्रीगुंडामहाराज (प्रथम) यांचे सद्गुरू होत . यांच्यापासून श्री गुंडामहाराजांना बोध प्राप्त झाला .

सिद्धरस हे देगलूरकर घराण्याचे मूळ कुलनाम . या घराण्यास प्राप्त झालेल्या जहागिरीची देखभाल करण्याच्या हेतूने देगलूर ( जि.नांदेड ,मराठवाडा )येथे स्थायिक झालेलं सिद्धरस पुढे देगलूरकर याच नावाने प्रसिद्ध झाले . अत्यंत धर्मनिष्ठा , आचार विचार संपन्न आणि परोपकारी घरण्यात सतत महाभारत , भागवत , श्रीज्ञानेश्वरी , श्रीतुकाराम गाथा इ.धर्म ग्रंथाचे वाचन , भजन , कीर्तन आणि पंढरीची वारी या सर्व गोष्टी कुलाचाराप्रमाणे केल्या जात होत्या . परंपरेतील सर्वच व्यक्ती नीतीसंपन्न , शुद्ध सात्त्विक , आचारवंत , अतिथींबद्दल अगत्यशील , गरिबांप्रती कणव असणाऱ्या आणि मुख्य म्हणजे समाजाचा पारमार्थिक विकास व्हावा ही समाज निष्ठा बाळगून त्या दृष्टीने प्रयत्नशील होत्या व समाजही देगलूरकर घराण्याचा नित्य आदर करीत होता , आजही करीत आहे .

‘कुल पवित्र जननी कृतार्थ | वसुंधरा पुण्यवतीच तेन | ’ किंवा

‘ पवित्र ते कूळ , पावन तो देश | जेथे हरीचे दास जन्म घेती | ’

या उक्तींची प्रचीती या कुळातील श्रीगुंडामहाराज प्रथम यांच्यापासून पुढे सर्वच व्यक्तींनी आपली पारमार्थिक उंची वाढवली , त्याचबरोबर समाजाच्या उद्धाराची काळजी घेतली . हे घराणे धर्महिताबरोबर समाजहितालाही महत्त्व देत आलेले दिसते . या सर्व गोष्टींचा पाया घातला तो आदिपुरुष श्री गुंडा महाराज सिद्धरस ( देगलूरकर ) यांनी .

सद्गुरू श्री गुंडानाथ महाराज ( आद्यपुरुष )

या घराण्याचे आदिपुरुष सद्गुरू श्री गुंडामहाराज हे संत चूडामणी महाराज यांचे अनुग्रहित व शिष्य ही होते . हरिकृपा साक्षात्कारी , अनुभव संपन्न , तत्त्वज्ञ , तत्त्वदर्शी आणि भजनानंदी संत असणाऱ्या श्री गुंडामहाराजांनी देगलूरजवळ रामपूर नामक ठिकाणी बारा वर्षे तीव्र तप केले होते . त्यानंतरही श्री विठ्ठल दर्शन न झाल्याने अस्वस्थ झालेल्या सद्गुरू श्री गुंडामहाराजांनी हातात वीणा व चिपळ्या घेऊन भजनास प्रारंभ केला होता . आता श्रीविठ्ठलाचे दर्शन झाल्याशिवाय विणा खाली ठेवायचीच नाही असा पण करून ते भजनात रंगून गेले होते . चोवीस तास केवळ ‘ विठ्ठल – विठ्ठल ’ हाच नाद होता . या भजनाने सद्गुरू श्री गुंडामहाराजांना श्री विठ्ठलाचे दर्शन दिल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतो . आपले आध्यात्मिक गुरू श्री चूडामणीमहाराज यांच्याकडे वास्तव्य असताना श्री गुंडामहाराजांनी वेद , शास्त्रे आणि संगीत याही विषयांचा अभ्यास केला होता . सद्गुरू श्री गुंडामहाराज म्हणजे ज्ञानोत्तर जीवनात इतरांसाठी आदर्शाचा धडा होत . त्यांनी सुमारे ७०० अभंगाची रचना केली . महाराजांच्या पश्चात पुढे याच परंपरेत वंश परंपरेने श्रीश्रीहारी महाराज , श्री गुंडामहाराज ( द्वितीय ) –

१) श्री नारायण महाराज – १)श्री गुंडा महाराज ( तृतीय ) ,२) श्री मार्तंड महाराज ३) श्री काशिनाथ महाराज

२)श्रीरामचंद्र महाराज – १)सद्गुरू श्रीधुंडामहाराज २) सद्गुरू श्रीबंडामहाराज

३) सद्गुरू श्रीमहिपती महाराज

तद्नंतर पुढे हा समर्थ वारसा प.पू.सद्गुरू श्री धुंडामहाराज देगलूरकर यांनी सांभाळला .पूज्य मोठ्या महाराजांच्या नंतर तोच वारसा प.पू.सद्गुरू श्री भानुदासमहाराज देगलूरकर यांनी सांभाळला. या परंपरेचे आद्यपुरुष सद्गुरू श्रीगुंडामहाराज व पूज्य गुरू परंपरेच्या चरणी साष्टांग दंडवत !

माहिती साभार - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित महाराष्ट्राचे शिल्पकार महाभागवत ह.भ.प.वै.धुंडामहाराज देगलूरकर या ग्रंथातुन .

संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

पुरस्कार

संपादन


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  • पंढरपूर भागवत कथा
  • माहिती साभार - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित महाराष्ट्राचे शिल्पकार महाभागवत ह.भ.प.वै.धुंडामहाराज देगलूरकर या ग्रंथातुन .

बाह्य दुवे

संपादन