चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्यसंग्रह)

(चंद्रमाधवीचे प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्रमाधवीचे प्रदेश हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे. इ.स.१९७७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. इ.स. २००८ मध्ये त्याची तिसरी आवृत्ती निघाली.

अर्पणपत्रिका

संपादन

ग्रेस यांनी हा काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांना अर्पण केलेला आहे.

परिचय

संपादन

मातृवनातील सावल्या, चंद्रमाधवीच्या प्रदेशांत, सूर्यास्ताचे पाणी आणि धर्मांतराच्या प्रार्थना अशा चार गुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. भय इथले संपत नाही... (निष्पर्ण तरूंची राई), ती गेली तेव्हा रिमझिम... (आई), घर थकलेले संन्यासी तसेच मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालेली पाऊस आला पाऊस आला... ह्या ग्रेस यांच्या प्रसिद्ध कविता या संग्रहात आहेत. कावळे उडाले स्वामी या शीर्षकाचीही एक कविता या संग्रहात आहे.