चंकी पांडे

भारतीय चित्रपट अभिनेते

सुयश चंकी पांडे (२६ सप्टेंबर, १९६२ --) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. याने आपल्या तीन दशकांहून मोठ्या कारकिर्दीत १००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

चंकी पांडे

पांडेचे १९८७-९४ दरम्यानचे हिंदीचित्रपट सगळ्यात यशस्वी होते . १९९४नंतर त्याची मुख्य भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटांना अपयश आल्यानंतर हिंदी चित्रपटांतील त्याची कारकीर्द बंद पडली. त्यानंतर त्याने १९९५पासून बांगलादेशी चित्रपटात काम केले. हे बहुतेक चित्रपट यशस्वी झाले. २००३ पासून हा हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम करत आहेत.

अनन्या पांडे ही हिंदी चित्रपट अभिनेत्री याची मुलगी आहे .

संदर्भ संपादन करा