गजानन यशवंत चिटणीस

भारतीय कम्युनिस्ट नेते
(ग.य. चिटणीस या पानावरून पुनर्निर्देशित)
Gajanan Yashwant Chitnis (es); गजानन यशवंत चिटणीस (mr); Gajanan Yashwant Chitnis (fr); Gajanan Yashwant Chitnis (en); গজানন যশবন্ত চিটনিস (bn); Gajanan Yashwant Chitnis (ast) Indian communist (en); भारतीय कम्युनिस्ट नेते (mr); politicus (nl) Dr. G. Y. Chitnis (en)

डॉ. गजानन यशवंत चिटणीस हे रॉयवादी विचारसरणीचे मराठी लेखक होते. हे नाट्यमन्वंतर संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. वर्तक, अनंत काणेकर, नारायण काळे प्रभृतींसमवेत चिटणीस यांनी नाट्यमन्वंतर द्वारे रंगभूमीवर लेखक श्रीधर विनायक वर्तक यांचे आंधळ्यांची शाळा हे नाटक आणले. या नाटकात त्यांनी भूमिकाही केली.

गजानन यशवंत चिटणीस 
भारतीय कम्युनिस्ट नेते
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावगजानन यशवंत चिटणीस (LL-Q1571 (mar)-SangeetaRH-गजानन यशवंत चिटणीस.wav)
जन्म तारीखसप्टेंबर २०, इ.स. १९००, सप्टेंबर १०, इ.स. १९००
मृत्यू तारीखऑगस्ट २२, इ.स. १९४९
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अभिनेत्री लीला चिटणीस त्यांची पत्नी होती. त्यांच्या विवाहाचे वेळी लीला नगरकरांचे वय १६ वर्षे होते. डॉ.ग.य.चिटणीस यांच्यामुळेच लीला चिटणीसांचा नाटकांशी आणि पुढे चित्रपटांशी संबंध आला. या जोडप्याला चार मुले झाली, आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या पहिल्या तीन मुलांची नावे मानवेंद्र, विनय आणि राज.

डॉ. ग.य.चिटणीस आणि त्यांच्या पत्नी लीला चिटणीस यांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. मार्क्सवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना घरी आश्रय दिल्याबद्दल ते दोघे अटक होताहोता वाचले.

मराठी पत्रकार परिषदेचे तिसरे अधिवेशन केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरले. या अधिवेशनात व्यावसायिक प्रश्नांबरोबरच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विचार झाला. या परिषदेत डॉ. ग.य. चिटणीस यांनी याबाबत ठराव मांडला होता व प्रभाकर पाध्ये यांनी त्याला अनुमोदन दिले होते.

डॉ. ग.य. चिटणीस लेखकही होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके -

डॉ. ग.य.चिटणीस यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • कुसुम (आशिया प्रकाशन)
  • गांधीवादाचे समर्थन
  • नवा पाईक (रामकृष्ण प्रकाशन मंडळ)
  • माझ्या आठवणी (पॉप्युलर प्रकाशन)
  • विजू