ग.ना. जाधव

मराठी चित्रकार

गजानन नारायण ऊर्फ ग.ना. जाधव (नोव्हेंबर १४, १९१७; कोल्हापुर- ५ जानेवारी, २००४) हे मराठी चित्रकार होते. विशेषकरून दृश्यकला या पद्धतीने ते चित्र काढत असत. जाधव यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१७ रोजी कोल्हापूर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव तर आईचे नाव तानाबाई होते. परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता चौथी नंतर थांबले. लहानपणीच त्यांना चित्रकलेत रस निर्माण झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना घरीच गणपतराव वडणगेकर व बाबूराव पेंटर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण मिळाले. त्यानंतर बाबा गजबर, माधवराव बागल, चित्रकार जांभळीकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. इ.स. १९४२ मध्ये त्यांचे लग्न 'इंदिरा कदम' यांच्याशी झाले.

पुढे 'किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ या मासिकांचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे तयार करण्याची त्यांना नोकरी मिळाली. त्याच काळात त्यांनी १९५३ मध्ये 'जी.डी. आर्ट पेन्टिंगचा' अभ्यासक्रम मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पहिल्या श्रेणीत पूर्ण केला.

त्यांनी विविध प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे सिटिंग पद्धतीने समोर बसवून काढली, ज्यात बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, म.म. दत्तो वामन पोतदार, प्र.के.अत्रे, शिल्पकार तालीम, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, कवयित्री शांता शेळके, ह.ना. आपटे, ना.सी. फडके, मालती किर्लोस्कर, अनंत काणेकर, चित्रकार अलमेलकर, चित्रकार रवींद्र मिस्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवी मनमोहन, गोपीनाथ तळवलकर यांचा समावेश आहे.[]


संदर्भ

संपादन