ग्वानाकास्ते प्रांत

ग्वानाकास्ते हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस अलाहुएला प्रांत तर आग्नेयेस पुंतारेनास प्रांत आहेत. इतर बाजूनी याला प्रशांत महासागराचा किनारा आहे.

ग्वानाकास्ते कोस्ता रिकाचा सगळ्यात विरळ वस्ती असलेला प्रांत आहे. याचा विस्तार १०,१४१ किमी असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ३,५४,१५४ होती.

नावाची व्युत्पत्ती

संपादन

या प्रांताला ग्वानाकास्ते या कोस्ता रिकाच्या राष्ट्रीय वृक्षाचे नाव दिलेले आहे.

अर्थव्यवस्था

संपादन

पशुपालन हा ग्वानाकास्तेचा मुख्य व्यवसाय आहे. येथे ब्राह्मण प्रकारच्या गायी पाळल्या जातात. येथे ऊस आणि कापसाची शेती होते आणि जेथे अरेनाल सरोवराचे पाणी उपलब्ध आहे तेथे भाताची शेतीही होते. गेल्या दोन दशकात ग्वानाकास्तेमध्ये पर्यटन व्यवसाय वाढीला लागला आहे. येथे मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात.

प्रशासन

संपादन

हा प्रांत अकरा कांतोनमध्ये विभागलेला आहे.